शिवसेनेतले प्रवेश पारखूनच : संजय राऊत

सचिन अहिर यांना शिवसेनेची विचारधारा पटल्याने ते आले आहेत, त्यांना कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी येथे केला. राजकारण हे साधु संतांचे राहिले नाही. पक्षनिष्ठा, विचार याला फारसं महत्त्व राहिलं नाही. मात्र, शिवसेनेत येणा-या लोकांना पारखून घेतलं जातं असल्याचंही ते प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले.
शिवसेनेतले प्रवेश पारखूनच : संजय राऊत

मुंबई  :  सचिन अहिर यांना शिवसेनेची विचारधारा पटल्याने ते आले आहेत, त्यांना कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी येथे केला. राजकारण हे साधु संतांचे राहिले नाही. पक्षनिष्ठा, विचार याला फारसं महत्त्व राहिलं नाही. मात्र, शिवसेनेत येणा-या लोकांना पारखून घेतलं जातं असल्याचंही ते प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

मुख्यमंत्रीपद ज्या पक्षाकडे असतं त्या पक्षामध्ये जाण्यात लोकांचा कल अधिक असतो. मात्र शिवसेनेत दोन नेते आले असून शिवसेनेची विचारधारा पटल्याने ते आले आहेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणं ही सध्याची परिस्थिति आहे. आपली खुर्ची टिकवायची आणि मग देश आणि समाज टिकावायचा, अशा विचारांची लोक आज राजकारणात आहेत, असेही राऊत म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे पन्नास नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य भाजप नेते ,मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरिश महाजन देशाचे मोठे नेते आहेत. कोण कुठे जातं आहे, हे त्यांना जास्त माहिती असते, असं सांगत राऊत यांनी महाजन यांना ही चिमटा काढला. विरोधी पक्ष टीकला पाहिजे. एखाद्या पक्षात गेल्यामुळे कुणी शुद्ध होतं या मताशी मी सहमत नाही. काँग्रेसमध्ये चोर, डाकू लोकं गेले होते मग ते शुध्द झाले का, असा सवाल ही राऊत यांनी उपस्थित केला.''

शिवसेना लोकांना पारखून प्रवेश देत आहे. हे आम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करणार. आपलं अस्तित्व टीकवण्यासाठी हे करावं लागतं. राजकारणात विचारधारा उरलेली नाही गरज आणि तडजोड म्हणून अनेक लोकं निर्णय घेतात. अनेक लोकांनी संघाला शिव्या दिल्या. पण आज ते त्यांच्या सोबत आहेत. आपण निवडणुकीत पराभूत होऊ, यासाठी हे होतं आहे. निवडणूक आली की आयाराम-गयारामचे प्रकार सुरु होतात," असेही राऊत म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com