वाद नको म्हणून भाजपऐवजी शिवसेनेत : अब्दुल सत्तार

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे थोड्याच वेळात शिवबंधन बांधणार आहेत. भाजपमध्ये जाता जाता शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अब्दुल सत्तार मातोश्रीकडे निघाल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Abdul Sattar
Abdul Sattar

औरंगाबाद : ''मी भाजपमध्ये जाणार होतो. पण भाजपच्या स्थानिकांनी विरोध केला. सुरुवातीलाच वाद झाला तर काय होते हे मला माहित असल्याने मी भाजपऐवजी शिवसेनेत जात आहे,'' असे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितले. दरम्यान, सत्तार यांनी सकाळी मेलवरुन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा पाठवून दिला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे थोड्याच वेळात शिवबंधन बांधणार आहेत. भाजपमध्ये जाता जाता शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अब्दुल सत्तार मातोश्रीकडे निघाल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. साम टिव्हीशी फोनवरुन बोलताना ते म्हणाले, ''सिल्लोड मतदारसंघाची जागा ही भाजपच्या वाट्याला असली तरी युती झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला ती जागा येणार, हे उद्धव ठाकरे यांचं वचन आहे. त्यामुळे मी विधानसभेमध्ये मोठ्या फरकाने विजय होणार. जय भवानी जय शिवाजी आणि जय महाराष्ट्र म्हणत शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवणार,"

सत्तार आज दुपारी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मातोश्रीचे दार ओलांडणार आहेत. त्यासाठी त्यांच्याबरोबर सिल्लोड तालुक्यातील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सदस्य सिल्लोड चे नगराध्यक्ष नगरसेवक सोबत आहेत.

राजीनामा आज दिला
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात प्रचार केला होता. मात्र त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. आज सकाळी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा मेलद्वारे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवून दिला सोबतच त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांच्या हस्ते हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला.

''महाराष्ट्रमध्ये शेतकऱ्यांची बाजू ज्या पद्धतीने शिवसेनेने गेल्या पाच वर्षात सभागृहात मांडली, त्याचा मी साक्षीदार आहे. सातबारा कोरा करण्यासाठी, कर्जमाफीसाठी, पिक विमा मिळवण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्याच नेत्यांनी प्रयत्न केले. आता मी शिवधनुष्य हातात घेऊन महाराष्ट्राच्या सभागृहात एल्गार पुकारणार आहे.'' असेही सत्तार म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com