अनिल भोसलेंना अजित पवारांशी घेतलेला पंगा महागात पडला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्यासह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे
Enmity with Ajit Pawar Proved Dearer to Anil Bhosale
Enmity with Ajit Pawar Proved Dearer to Anil Bhosale

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्यासह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात अनिल भोसले यांच्यासह चौघांजणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक झाली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांशी पंगा घेतल्यानेच भोसले  गजाआड झाल्याचे उघड आहे.

भोसले यांच्यासह तानाजी पडवळ शैलेश भोसले,एस. व्ही जाधव हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.शिवाजीराव भोसले बँकेत कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ठेवीदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी ११ जणांना विरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात भोसले आणि त्यांचे काही नातेवाईक अडचणीत आले होते.

भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधान परिषदेत दुसऱ्यांदा निवडून आले. त्यानंतर मात्र, पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांचे तिकिट कापण्यात आल्याने भोसले नाराज झाले आणि त्यांनी भाजपशी घरोबा केला. 

या निवडणुकीत त्यांच्या पत्नी रेश्मा या भाजपच्या नगरसेविका झाल्या. तेव्हा अनिल भोसले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वैर निर्माण झाले. मात्र, भाजपात आपल्याला फारशी किमत मिळत नसल्याने भोसले दांम्पत्य गेल्या काही दिवसांपासून भाजपातही नाराज होते. त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विशेषत:

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपकांत जाण्याच्या प्रयत्नात ते होते. मात्र, महापालिका निवडणुकीत भोसले यांनी अजित पवार आणि काही नेत्यांवर वैयक्तिकरित्या तोंडसुख घेतल्याने अजित पवार त्यांच्या चिडले होते. या पार्श्वभूमीवर भोसले यांना अटक झाल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com