छत्रीच्या माध्यमातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट शर्मा कोणाचा गेम करणार ?

..
Pradeep-Sharma-
Pradeep-Sharma-

नालासोपारा  :   हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या  गडाला खिंडार पाडण्यासाठी एन्काऊंटर स्पेशालिस्ट   प्रदिप शर्माची यंत्रणा नालासोपारा विधानसभा कार्यक्षेत्रात  सक्रिय झाले आहेत . 

प्रदीप शर्मा याचे छायाचित्र असलेल्या छत्र्या नालासोपारा भागात अचानक अवतरल्या असून या छत्र्या सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहेत . पण गेल्या  तीस वर्षा पासुन हितेंद्र ठाकुरांची येथील जनतेशी जुळलेली नाळ तोडण्यात प्रदिप शर्मा खरच यशस्वी होतील का हा मात्र प्रश्नच आहे. 

प्रदीप शर्मा यांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज अजून मंजूर झाला आहे की नाही हे स्पष्ट झालेलं नाही . मात्र त्यामुळे प्रदीप शर्मा जाहिरपणे कोणतीही राजकीय भूमिका घेत नसले तरी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत . प्रदीप शर्मा यांच्यासारखा प्रबळ मोहरा पुढे करून शिवसेना - भाजपतर्फ़े हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला भुईसपाट करण्याचे निकराचे प्रयत्न येत्या विधानसभा निवडणुकीत होणार अशी चिन्हे दिसत आहेत . 

एकोणीशे नव्वदच्या दशकापासुन वसई, विरार नालासोपा-यावर हितेंद्र ठाकुरांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी मागच्या लोकसभेच्या पोटनिवडणूकीपासुन शिवसेना, भाजपने याठिकाणी ताकत पणाला लावली आहे.  साम, दाम, दंड, भेद वापरुन कोणत्याही परिस्थीती हा गड जिंकायचा असा कयास बांधला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रदिप शर्माला नालासोपारा  विधानसभेत शिवसेनेकडुन उतरविण्यासाठी यंत्रणाही सक्रिय केली आहे. 

प्रदिप शर्मा यांनी पोलिस खात्यातुन निवृत्ती घेण्या आगोदरच पावसाळी छत्र्यांच्या माध्यमातुन नालासोपारा विधानसभेत त्यांची इंन्ट्री झाली आहे. पण येणा-या विधानसभा निवडणूकीत मागच्या तीस वर्षापासुन येथील जनतेशी हितेंद्र ठाकुरांची जुळलेली नाळ तोडण्यात खरच प्रदिप शर्मा यशस्वी होतील का? हे मात्र येणा-या काळात पहावे लागणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com