जाचक अट रद्द करून एकाचवेळी तीन महिन्याच धान्य द्या : दानवे

गरिब पॅकेजमधील अन्न योजनेतंर्गत राज्यातील जनतेला नियमित मिळणाऱ्या पाच किलो रेशनव्यतिरिक्त दर महिन्याला पाच किलो गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे.
जाचक अट रद्द करून एकाचवेळी तीन महिन्याच धान्य द्या : दानवे

जालनाः कोरोना विषाणूचा संसर्गाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशातील गरिब जनतेसाठी पुढील तीन महिने नियमित अन्न धान्याव्यतिरिक्त  पाच किलो गहू व तांदूळ  मोफत देण्याची घोषणा  केंद्र सरकारने केली आहे.

मात्र, राज्य शासनाने सुरूवातीला नियमित धान्य वाटपानंतर मोफतचे अन्नधान्य वाटप करण्याची अट घातली आहे. ही जाचक अट रद्द करून एकाचवेळी तीन महिन्याचे मोफत अन्नधान्य जनतेला वाटप करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.  

शहरातील गरिब कुटुंबाना दानवे यांनी शनिवारी (ता.4) अन्नधान्याचे वाटप केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दानवे म्हणाले , कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने 14 एप्रिल पर्यंत देशात लॉकडाऊन केले आहे.

या काळात गरिब जनतेचे हाल होऊ नये म्हणून एक लाख सत्तर हजार कोटीच गरिब पॅकेज जाहीर करण्यात आलेे.  या पॅकेजच्या माध्यमातून विविध घटकातील गरिबांसाठी अनेक योजनांची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 

 राज्यातील शिधापत्रिका धारक कुटुंबाची संख्येनूसार राज्याला 22 लाख टन अन्नधान्याची गरज आहे.  सध्या 12 लाख टन गहू व 8 लाख टन तांदूळ उपलब्ध आहे.

 गरिब पॅकेज योजनेतंर्गत केंद्र सरकारने पंजाब व हरियाणा राज्यातून 16 रेल्वे रॅकद्वारे पन्नास हजार टन गहू व तांदूळ घेऊन महाराष्ट्रात पाठवल्या आहेत.  त्यामुळे अन्नधान्यांची  कमतरता नाही.

 राज्य शासनाने अन्नधान्य वाटपातील जाचक अट रद्द करून  उपलब्ध अन्नधान्यांची उचल करून एकाच वेळी नियमित व मोफत अन्नधान्याचा पुरवठा जनतेला करावा. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याशी चर्चा केल्याचेही रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com