औरंगाबादेत अकराव्या कोरोना रुग्णाची नोंद; घाटीतील कर्मचाऱ्याला बाधा

औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय अर्थात घाटीतील एका ३८ वर्षीय पुरुष कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. काल रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अपघात विभागात ब्रदर म्हणून तो कार्यरत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत
Elevent Corona Patient Found in Aurangabad Ghati Hospital
Elevent Corona Patient Found in Aurangabad Ghati Hospital

औरंगाबाद : औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय अर्थात घाटीतील एका ३८ वर्षीय पुरुष कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. काल रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अपघात विभागात ब्रदर म्हणून तो कार्यरत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या शिवाय त्याच्या संपर्कात आलेली त्याची पत्नी आणि आणखी एका ब्रदरच्या स्वबची टेस्ट केली जाणार आहे. कोरोनाबाधित ब्रदरला तीन दिवसांपासून सर्दीचा त्रास होत होता. खबरदारी म्हणून स्वब घेण्यात आल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. रविवारी एकाच दिवशी ७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

एन ४ मध्ये ३, सातारा परिसर १, देवळाई १, जलाल कॉलनी २, अरिफ कॉलनी १ आणि रोशन गेट १ अशा रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. 11 पैकी 1 रुग्ण काल दगावला आहे. तर एक प्राध्यापक महिला बरी होऊन परतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com