निवडणुका संपल्या अन राधाकृष्ण विखेंनी हात वर केले ः शिवाजी कर्डिले

थकबाकी शंभर कोटींच्या पुढे जाऊन बॅंकही अडचणीत येईल. त्यामुळे बॅंकेलाही नियमानुसार कारवाई करून कारखानाच ताब्यात घ्यावा लागेल.सीताराम गायकर, जिल्हा सहकारी बॅंक
Shivaji Kardile attacks Radhakrishn  Vikhe
Shivaji Kardile attacks Radhakrishn Vikhe

नगर  :  तनपुरे साखर कारखाना पुनरुज्जीवित व्हावा, यासाठी आपण पुढाकार घेतला. राधाकृष्ण विखे पाटील व डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या विनंतीमुळे तो संचालकांच्या ताब्यात दिला. परंतु विखे पाटील यांनी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ताब्यात घेतला का, असा प्रश्न पडतो. 42 कोटी थकले आता त्यांनी हात वर केले, असा आरोप माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी विखे पितापुत्रांवर केला.


डाॅ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची थकबाकी वाढल्याने जिल्हा सहकारी बॅंकेच्या भूमिकेबाबत आज बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी भूमिका मांडली. या वेळी जिल्हा बॅंकेचे ज्येष्ठ संचालक व माजी आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होेते. कर्डिले यांनी बोलताना विखे पितापुत्रांवर आरोप केले. साखर कारखाना अडचणीत येऊ नये म्हणून आपण भूमिका घेतली, मात्र विखे पाटील यांनी कारखान्याचा वापर केवळ निवडणुकीपुरताच केला, असा आरोप कर्डिले यांनी केला.
 

गायकर यांनी तनपुरे कारखान्याबाबत भूमिका मांडताना सांगितले, की कारखाना बंद असल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. थकबाकी शंभर कोटींच्या पुढे जाऊन बॅंकही अडचणीत येईल. त्यामुळे बॅंकेलाही नियमानुसार कारवाई करून कारखानाच ताब्यात घ्यावा लागेल,असे सांगितले.


गायकर म्हणाले, की कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक झाल्यावर नवे संचालक मंडळ अस्तित्वात आले. 17 एप्रिल 2017 रोजी कारखान्याच्या सर्व कर्ज खात्यांचे पुनर्गठन केले. हप्ते पाडून दिले. बॅंकेने फक्त शेतकरी व कामगारहिताचा विचार केला. 2017-18 व 2018-19मध्ये संचालक मंडळाने कारखाना चालू ठेवला.

दोन वर्षांत व्याजापोटी अनुक्रमे एक कोटी 15 लाख व 13 कोटी 68 लाख 41 हजार रुपयांचा भरणा बॅंकेत दिला. मात्र, अपेक्षित भरणा मिळाला नाही. 25 मे 2019 रोजी अकरा कोटी 25 लाख 35 हजार थकीत झाले. 2019-20मधील वसुली 21 कोटी 49 लाख 42 हजार वसूल होऊ शकणार नाही. ही संचालक मंडळाची जबाबदारी होती. परंतु त्यांनी कराराचा भंग केला. त्यामुळे जिल्हा बॅंक अडचणीत येत असल्याने नियमानुसार कारवाई केली जाईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com