निवडणुकीच्या कामाला दांडी मारणाऱ्या सहा शिक्षकांना अटक

परंतु निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात गाडगे महाराज महाविद्यालयातील पाच कर्मचारी वेळेवर हजर राहिले नाही. म्हणून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी राहुल तायडे यांनी नायब तहसीलदार डाबेराव यांना संबंधित महाविद्यालयात पाठवून प्राचार्याची भेट घेऊन आदेश दिलेल्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यास सांगितले. तरीही प्राचार्याने पाच कर्मचाऱ्यांना न पाठविल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी मूर्तिजापूर पोलीस स्टेशनमध्ये प्राचार्यासह सहा कर्मचाऱ्यांविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली.
निवडणुकीच्या कामाला दांडी मारणाऱ्या सहा शिक्षकांना अटक

अकोला : मतदान करणे जसे राष्ट्रीय कार्य आहे, तसे निवडणूक विभागाने दिलेले काम चोखपणे बजावणे हे सुद्धा बंधनकारकच आहे. असे असतांनाही मुर्तिजापूर येथील गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह सहा कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामाला दांडी मारली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मूर्तिजापूर तालुक्‍यात 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही निवडणुकीची प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पाडण्याकरिता तालुक्‍यातून विविध कार्यालयांतील 800 अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. या निवडणुकीदरम्यान गाडगे महाराज महाविद्यालयातील 14 कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला होता. 

परंतु निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात गाडगे महाराज महाविद्यालयातील पाच कर्मचारी वेळेवर हजर राहिले नाही. म्हणून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी राहुल तायडे यांनी नायब तहसीलदार डाबेराव यांना संबंधित महाविद्यालयात पाठवून प्राचार्याची भेट घेऊन आदेश दिलेल्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यास सांगितले. तरीही प्राचार्याने पाच कर्मचाऱ्यांना न पाठविल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी मूर्तिजापूर पोलीस स्टेशनमध्ये प्राचार्यासह सहा कर्मचाऱ्यांविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. 

ठाणेदारांनी त्वरित कारवाई करून पीएसआय खंडेराव यांना वॉरंट घेऊन पाठवून प्राचार्यासह सहा कर्मचाऱ्यां अटक करून तहसील कार्यालयात नेले. या अटक केलेल्यांमध्ये प्राचार्य संतोष ठाकरे, प्रा. दिवाकर पवार, मुख्य लिपिक हरिभाऊ बोपटे, प्रा. दिलीप शहाडे, प्रा. अनिल ठाकरे, प्रा. सचिन मारोडे यांचा समावेश असून, त्यांना पुढील कारवाई करून वैयक्तिक जातमुचलक्‍यावर सोडण्यात आले आहे. 
 
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com