election commission menu card is outdated | Sarkarnama

आयोगाचे मेन्यूकार्ड आऊटडेटेड 

प्रशांत कांबळे  
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मुंबई :  विधानसभा निवडणुकीासाठी राज्य सरकारने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्‍चित करताना खाद्य पदार्थ,स्टेशनरी तसेच कर्मचाऱ्यांचे दरही निश्‍चित केले आहेत  . मात्र,हे दर किमान तीन ते चार वर्षांपुर्वीचे असल्याची प्रतिक्रीया उमेदवारांचे प्रतिनिधी व्यक्त करत असून आमच्या पाहणीतही मुंबईत शाकाहारी थाळी 90 रुपये आणि वडापाव 12 रुपयांमध्ये मिळत नसल्याचे आढळले.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना 28 लाख रुपयां पर्यंत खर्च करता येतो.या खर्चाची मर्यादा वाढविण्याची मागणी प्रत्येक निवडणुकीत केली जाते. यंदाही अशी मागणी केली गेली होती.मात्र,ती अमान्य करण्यात आली.त्याच बरोबर निवडणुकीत उमेदवारला लागणाऱ्या प्रत्येक बाबीचे दर आयोगा मार्फत निश्‍चित केले जातात.

त्या पेक्षा जास्त खर्च एखाद्या गोष्टीवर करता येत नाही.उमेदवाराच्या प्रचार कार्यालयात दिवसभर राबणाऱ्या कार्यकर्त्याला अवघा 100 रुपये खाद्य भत्ता निश्‍तिच करण्यात आला आहे. या पैशात सकाळचा नाष्टाही होऊ शकत नाही अशी तक्रार कार्यकर्ते करत आहेत. तशीच अवस्था अनेक बाबींची आहे. त्यामुळे आयोगाला खर्च सादर करताना हिशोब जुळवताना उमेदवारांना मेंदू झिजवावा लागणार आहे.

खाद्यपदार्थखाद्यपदार्थ - आयोगाचे दर - बाजारातील दर

चहा - 11 - 15

कॉफी - 14 - 25

स्नॅक (पोहा,उपमा, शिरा, इडली)- 25 - 30

जेवण शाकाहारी - 90 - 150

जेवण मासांहारी - 110-250 ते 300

पुलाव, बिर्याणी (शाकाहारी)- 70 - 250

पुरी भाजी - 60 - 80

सॉफ्ट ड्रिंक (250एमएल)- 22 - 25

शहाळ - 25 - 40 ते 60

पाण्याचे गॅलन - 60 - 80

पाण्याचे ग्लास - 5 - 8 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स