अनंत चतुर्दशीनंतर आचारसंहिता लागणार ? आयोगाकडून आढावा

अनंत चतुर्दशीनंतर आचारसंहिता लागणार ? आयोगाकडून आढावा

सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता अनंत चतुर्दशीनंतर (ता.12) कोणत्याही क्षणी लागेल, हे गृहित धरून राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य यंत्रणांना निवडणुकीसाठीचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने काल दुपारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांसह प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. 

विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिन्हा, संदीप सक्‍सेना, उपनिवडणूक आयुक्त सुदीप जैन, चंद्रभूषण कुमार, महासंचालक धीरेंद्र ओझा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांशी निवडणूक तयारीबाबत संवाद साधला. सूचना दिल्या. संपूर्ण राज्यातील अंतिम मतदार याद्या 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. 

जिल्ह्यात मतदारांची संख्या लोकसभेपेक्षा 12 हजार 248 नी वाढली आहे. ती 23 लाख 75 हजार एवढी झाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला उपस्थित होते. 

आयोगाच्या सूचना 
0 मतदार जनजागृती कार्यक्रम लवकरात लवकर राबवा 
0 मतदान केंद्र हलवण्याबाबत सज्ज राहा. पूरग्रस्त भागात मतदान केंद्र हलवायचे असेल, तर तातडीने निर्णय घ्या 
0 मतदार यादीतील नावे वगळण्याबाबत काळजीपूर्वक तपासणी करा 
0 सीमावर्ती जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्थेची काळजी घ्यावी 
0 अंतिम मतदार यादी राजकीय पक्षांना उपलब्ध करून द्या 
0 मतदान केंद्रावर आसनव्यवस्था करा 
0 निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पथकांची नियुक्ती करा 
0 या पथकांना खर्चाचा ताळेबंद कसा ठेवायचा, याचे प्रशिक्षण द्या 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com