स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बसपा नगरसेवकांना गैरहजर राहण्याचा पक्षादेश

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बसपा नगरसेवकांना गैरहजर राहण्याचा पक्षादेश

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येत्या 19 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीत बसपाच्या पाच नगरसेवकांना मतदानाच्या दिवशी गैरहजर राहण्याचा पक्षादेश बजावण्यात आला आहे. औरंगाबाद महापालिकेत बसपचे पाच नगरसेवक आहेत. या सर्वांना मतदान न करता गैरहजर राहण्याच्या सूचना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी संबंधितांना दिल्या आहेत. महायुतीचे अंबादास दानवे आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांच्यात सोमवारी थेट लढत होणार आहे. युतीकडे बहुमत असल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी वाटत असली तरी ऐनवेळी काय घडेल यांचा अंदाज येत नाही. अंबादास दानवे यांनी युतीच्या मतदारांना सहलीवर नेले आहे, तर कॉंग्रेसचे सदस्य आपापल्या जिल्ह्यातच थांबून आहेत. 

एमआयएम व अपक्ष मतदारांवर या निवडणुकीचे बरेच भवितव्य अवलंबून आहे. अपक्षांमध्ये औरंगाबाद महापालिकेतील प्रेमलता दाभाडे, विजया बनणकर, सुनिता चव्हाण, भारती सोनवणे व राहूल सोनवणे या बहुजन समाज पार्टीच्या नगरसेवकांचा समावेश आहे. युती आणि आघाडीच्या उमेदवाराने ही मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न देखील केल्याची चर्चा आहे. परंतु मतदान तीन दिवसांवर आले असतांना पक्षाच्या वतीने या सर्व नगरसेवकांना कोणत्याच उमेदवाराला मतदान न करता अनुपस्थित राहावे असा आदेश बजावण्यात आला आहे. पक्षादेशाचे उल्लघंन केल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील या पक्षादेशाद्वारे जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांनी नगरसेवकांना दिला आहे. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्याकडे बहुमताचे संख्याबळ असल्यामुळे बसपाचा हा व्हीप त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकते असे दिसते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com