मनमाडकरांच्या उद्रेकाची वाट नका पाहू : पंकज भुजबळ

मनमाडला पाणीपुरवठा होणाऱ्या धरणातील पाणी संपले. आवर्तनाचे पाणी मिळालेले नसल्याने मनमाडचे नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे नगरपालिकेतील सदस्यांसह खासदार डॉ. पवार, आमदार भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संतप्त प्रतिक्रीयेची दखल घेत जिल्हाधिकारी मांढरे यांनी मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांच्या कामकाजाच्या चौकशीच्या सूचना देत, त्वरीत 10 दिवसांसाठी टंचाई उपाययोजनेच्या सूचना दिल्या.
मनमाडकरांच्या उद्रेकाची वाट नका पाहू : पंकज भुजबळ

नाशिक : कायम तहानलेल्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर असलेल्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाचा साठा संपला. मात्र अद्याप प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नवनिर्वाचित खासदार भारती पवार, आमदार पंकज भुजबळांसह स्तानिक नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सामान्यतः मृदू स्वभावाचे आमदार भुजबळ यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. "धरण कोरडे पडले. शहराला पाणीपुरवठा बंद झाला तरी तुम्ही नियोजन करत नाहीत. मग काय मनमाडकरांच्या उद्रेकाची वाट पहाताय का?'' असा थेट सवाल त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना केला. 

मनमाडला पाणीपुरवठा होणाऱ्या धरणातील पाणी संपले. आवर्तनाचे पाणी मिळालेले नसल्याने मनमाडचे नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे नगरपालिकेतील सदस्यांसह खासदार डॉ. पवार, आमदार भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संतप्त प्रतिक्रीयेची दखल घेत जिल्हाधिकारी मांढरे यांनी मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांच्या कामकाजाच्या चौकशीच्या सूचना देत, त्वरीत 10 दिवसांसाठी टंचाई उपाययोजनेच्या सूचना दिल्या. या बैठकीत, सदस्यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रचंड रोष व्यक्त केला. पालखेडमधून पाणी सोडले आहे. मात्र हे पाणी मिळण्यास सहा दिवस लागणार असल्याने तोपर्यत तात्पुरती उपाययोजना करुन पाणी देण्याचे ठरले. 

मनमाडच्या नगरसेवकांनी तक्रारी मांडतांना आवर्तनाला दिरंगाई झाली. नगरपालिका यंत्रणा दुर्लक्ष करते. पहिले आवर्तन सोडतांना मनमाडला कमी पाणीमिळाले. आवर्तन सोडल्यानंतर तळाकडील गावाकडून वरच्या गावातील बंधारे भरतांना पाणी उचलू देत नाही. आणि सरतेशेवटी वरच्या मनमाडला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे 'टेल टू हेड' ही पध्दत मनमाडकरांना मारक ठरते. नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाणीप्रश्‍नांवर गंभीर नाही. रमजान सण तोंडावर असतांना पाणी टंचाई होणार असेल तर लोक रस्त्यावर येतील. 10 दिवसांत पाणी मिळाले नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशारा नगरसेवकांनी दिला. 

मनमाडच्या पाण्यासाठी आता आम्ही येणार नाही, जिल्हा यंत्रणेला तिथेच यावे लागेल. वीस विस दिवस पाणी येत नाही, धरणातील पाणी संपूनही नगरपालिका लक्ष घालत नाही. दरवेळी लोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी होते. - डॉ.भारती पवार  

मनमाडचे पाणी 25 मेला संपणार आहे. हे नगरपालिकेला माहीती असूनही नगरपालिकेने पाण्यासाठी काय हालचाली केल्या. करंजवण मधून पालखेड व तेथून मनमाडपर्यत पाणी पोहोचण्यासाठी किमान 5 दिवस लागतात प्रशासकीय दिरंगाई झाल्यामुळेच लोकांच्या उद्रेक होतो आहे. उद्रेकाला आमंत्रण देणाऱ्या दिरंगाईची दखल घेतली जावी.  -पंकज भुजबळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com