एकनाथ शिंदे  सार्वजनिक बांधकाम, आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते  - eknatha shinde birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

एकनाथ शिंदे  सार्वजनिक बांधकाम, आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

 एकनाथ संभाजी शिंदे हे आज शिवसेनेतील सर्वात वजनदार मंत्री. ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा म्हणून त्यांची ओळख आहे. दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या शिंदेंची ठाणे आणि जिल्ह्यावर चांगली पकड आहे. काहीसे मित्तभाषी असलेल्या या नेत्याने मात्र आपल्या कामातून स्वत:ला सिद्ध केले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ते युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील नेते म्हणून ते ओळखले जातात. शिवसेनेचे ठाण्यातील नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष ते दोन वेळा कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर युतीत मतभेद झाल्याने शिवसेना जेव्हा विरोधी बाकावर बसली तेव्हा ते थेट विरोधीपक्षनेते बनले. त्यानंतर पक्ष सत्तेत गेला तेव्हा त्यांच्याकडे पीडब्ल्यूडी सारखे महत्त्वाचे खाते आले.

आज ते आरोग्यमंत्रीही आहेत. शिवसेनेचा कार्यकर्ता ते मंत्री असा प्रवास राहिलेल्या शिंदेंनी शिवसेनेचे असे कोणतेही आंदोलन नाही की त्यात ते सहभागी झाले नाहीत. ठाकरे घराण्यांचा निष्ठावंत शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच की काय त्यांच्याकडे मोठमोठी पदे आणि खातीही येत गेली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख