eknatha khadase meet pankaja munde | Sarkarnama

नाराज एकनाथ खडसे नाराज पंकजा मुंडेंच्या भेटीला ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मुंबई : "" भाजपच्या नाराज नेत्या आणि माजी ग्रामविकास राज्यमंत्री पंकजा मुंडे यांची दुसरे नाराज नेते आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे ही भेट घेणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे. मुंडेच्या नाराजीने भाजपला धक्का बसला होता. मुंडे यांची समजूत काढण्यासाठी पक्षातील अनेक दिग्गज नेते सरकावले आहेत. 

मुंडे यांच्या ट्‌विटरवरून खऱ्या अर्थाने चर्चेला सुरवात झाली. राज्यात भाजपचे सरकार पायउतार झाल्यानंतर जे नाराज आणि असंतुष्ठ नेते होते त्यांनी न घाबरता प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली. खडसे यांनी तर कोणाचेही नाव न घेता राज्यातील पक्षनेतृत्वावर हल्लाबोल केला होता. गेल्या चार वर्षापासून काहीसे अस्वस्थ असलेले नेते आता उघड बोलत आहेत. त्यातच पंकजा मुंडेंची नाराजी पुढे आली. 

माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षात अस्वस्थ असून त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. मात्र आपण कदापी बंडखोरी करणार नसल्याचे खुद्द मुंडे यांनीच म्हटले आहे. आतापर्यंत विनोद तावडे, राम शिंदे, बबनराव लोणीकर आदी नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. आता तावडेंपाठोपाठ खडसे हे ही त्यांची भेट घेणार आहेत.

 खडसे हे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. मुंडे यांनी खडसे यांना राजकारणा मोठी संधीही दिली आहे. त्यामुळे खडसे-पंकजा मुंडे यांच्या भेटीला महत्व आहे. या दोघांमध्ये नेमके काय ठरते ? 12 डिसेंबररोजी मुंडे या कोणता निर्णय घेतात याकडेही भाजपसह सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख