एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्रीपद

एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्रीपदाबरोबरच नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
eknath shinde new state minister
eknath shinde new state minister

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खाते सोपवण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे इतर 9 खात्यांचा कार्यभार असणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यापासून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये खातेवाटपाचा घोळ सुरू होता. तो आज संपला. मुख्यमंत्रीपदानंतर सर्वाधिक महत्वाचे असलेले गृहमंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीत संघर्ष सुरू होता. शिवाय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्रीपद स्वत:कडेच ठेवतील, असे मानले जात होते. मात्र प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवले आहे. 

एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्रीपदाबरोबरच नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. अर्थात एवढी सर्व खाती आगामी विस्तारापर्यतच राहणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com