एकनाथ शिंदेंनी सुनावले अशोक चव्हाणांना

राज्याचे महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालावे एवढीच आमची अट आहे, त्या व्यतिरिक्त शिवसेनेने कुणालाही काहीही लिहून दिलेले नाही, असे शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे
Eknath Shinde Answers Ashok Chavan Statement
Eknath Shinde Answers Ashok Chavan Statement

मुंबई : राज्याचे महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालावे एवढीच आमची अट आहे, त्या व्यतिरिक्त शिवसेनेने कुणालाही काहीही लिहून दिलेले नाही, असे शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 

घटनेच्या बाहेर जाऊन काम करणार नाही, असे आम्ही शिवसेनेकडून लिहून घेतले आहे, अन्यथा आम्ही सरकारबाहेर पडू असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्याचा समाचार एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आम्ही राज्य घटनेच्या चौकटीत सरकार चालवण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत आणि सरकार तसेच चालेल. मात्र, किमान समान कार्यक्रमा व्यतिरिक्त आम्ही कुणालाही काहीही लिहून दिलेले नाही, असे शिंदे यांनी सांगितले. 

अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली होती. सत्तेसाठी शिवसेना काहीही लिहून द्यायला तयार आहे, अशी टिका व्हायला सुरुवात झाली होती. मात्र आता शिंदे यांनी चव्हाण यांना उत्तर देऊन ही चर्चा संपवण्याचा प्रयत्न केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com