Eknath Khadse on Shivsena's claim on CM post | Sarkarnama

शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी स्वाभाविक :  एकनाथ खडसे

सरकारनामा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

शिर्डी :  शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी स्वाभाविक आहे, परंतु भाजप आणि शिवसेना यांच्यात नेमकं काय ठरलेला आहे हे मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली एकनाथ खडसे यांनी आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

शिर्डी :  शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी स्वाभाविक आहे, परंतु भाजप आणि शिवसेना यांच्यात नेमकं काय ठरलेला आहे हे मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली एकनाथ खडसे यांनी आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

सर्वसामान्य माणसे कुठली चांगली गोष्ट घडल्यानंतर साईबाबांच्या दर्शनाला येतात मी मात्र  मात्र नियमित दर्शनाला येणारा आहे . या वेळी माझ्या मुलाचा पराभव झाला असला तरीसुद्धा मी  दर्शनासाठी आलेलो आहे . 

राज्यात सत्ता स्थापनेवरून  सुरू असलेल्या सत्तासंघर्षाबाबत भाष्य करताना एकनाथ खडसे म्हणाले,  महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर यावे असे मला वाटते . महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीलाकौल  दिलेला आहे . त्यामुळे दोघांचे  मिळून सरकार राज्यात अस्तित्वात यावे. 

शिवसेना असे म्हणते की जसे ठरवले आहे तसे करा, परंतु काय ठरले आहे हे दोघांनी मला सांगितले नाही . त्यामुळे मला नेमकं काय ठरलं हे माहिती नाही.  महायुतीचे सरकार यावे अशी माझी भावना आहे. 

श्री. खडसे पुढे म्हणाले, शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी करणे हे स्वाभाविक आहे . परंतु तसे ठरलेले आहे का हे मला माहिती नाही . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा व्हावेत असे मला वाटते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असे जाहीर केलेले आहे . त्याचप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा  केलेली आहे.  

संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत रोज फटकेबाजी चाललेली असताना भाजप बॅकफूटवर झाली आहे काय असे विचारले असता ,श्री. खडसे म्हणाले , भाजप बॅकफूटवर नाही . शांततेनेच  तोडगा निघेल . त्यामुळे युती टिकावी म्हणून भाजपतर्फे प्रयत्न केले जात आहेत . वादग्रस्त विधाने करून दोन पक्षांमधील तणाव वाढविण्यापेक्षा शांततेने घेण्याचा निर्णय भाजपने घेतलेला दिसतो आणि तो योग्य आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या पेचप्रसंगात  आता मध्यस्थी करणार काय असे विचारले असता श्री. खडसे म्हणाले,   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला नेहमीच सल्ला आणि मार्गदर्शन केलेले आहे . पण संघाने कधीही  आदेश दिलेला नाही. 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार राज्यात येईल  काय असे विचारले असता श्री .  खडसे म्हणाले, ही वेळ येणार नाही.  भाजपला अपेक्षित यश मिळालेले नसलं तरी शिवसेना आणि भाजप मिळून सरकार बनवतील असे मला वाटते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख