...म्हणून मी आणि पंकजा आदित्य ठाकरेंना जवळचे वाटतो : एकनाथ खडसे

शिवसेना व भारतीय जनता पक्षाची वर्षानुवर्षे युती राहिली आहे. हिदुंत्व ही आमची विचारधारा राहिलेली आहे. त्यामुळेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मी व पंकजा मुंडे जवळचे वाटत असावे.असे मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले
Eknath Khadse Replies Comment of Aditya Thackeray
Eknath Khadse Replies Comment of Aditya Thackeray

जळगाव : शिवसेना व भारतीय जनता पक्षाची वर्षानुवर्षे युती राहिली आहे. हिदुंत्व ही आमची विचारधारा राहिलेली आहे. त्यामुळेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मी व पंकजा मुंडे जवळचे वाटत असावे.असे मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

संगमनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमात पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना प्रश्‍न विचारणात आला होता. त्यात म्हटले होते, की भारतीय जनता पक्षाचे कोणते नेते तुम्हाला जवळचे वाटतात. त्यावर उत्तर देतांना आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते कि, एकनाथराव खडसे व पंकजा मुंडे हे दोन्ही नेते आम्हाला जवळचे वाटतात. हे दोन्ही नेते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. ते महाविकास आघाडीसाठी आवश्‍यक आहेत.

याबाबत एकनाथराव खडसे यांना आदित्य ठाकरे यांच्या मतावर प्रश्‍न विचारला असता, खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची वर्षानुवर्षे युती राहिलेली आहे, हिंदुत्व ही आमची विचारधारा राहिलेली आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यानां एकनाथ खडसे व पंकजा मुंडे जवळचे वाटत असावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com