Eknath Khadse Reaction on Three State Polls | Sarkarnama

तीन राज्यांमधील पराभवाबाबत आत्मचिंतन व्हायला हवे : एकनाथ खडसे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

''मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यांत निवडणुकीच्या निकालांवर संघटनात्मक व अन्य मुद्द्यांचे काय परिणाम झाले ते शोधून महाराष्ट्रात पुढील निवडणुकांच्या दृष्टीने मजबुती आणण्याचे प्रयत्न करावे लागतील,'' असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

जळगाव : ''मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यांत निवडणुकीच्या निकालांवर संघटनात्मक व अन्य मुद्द्यांचे काय परिणाम झाले ते शोधून महाराष्ट्रात पुढील निवडणुकांच्या दृष्टीने मजबुती आणण्याचे प्रयत्न करावे लागतील,'' असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

तीन राज्यांतील निवडणुकांमधील पिछेहाटीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना खडसे म्हणाले, "कुठल्याही निवडणुकांमधील विजय किंवा पराजयाचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनावर होत असतो. त्यामुळे महाराष्ट्रात त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. मात्र, महाराष्ट्रात सरकार विरोधात नाराजीचा परिणाम निवडणुकांमध्ये होणार नाही,"

ते पुढे म्हणाले, "मध्य प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात पंधरा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. या तिन्ही राज्यांत भाजप विकास कामांबाबत अग्रेसर राहिला हे मान्य करावे लागेल. अर्थात पंधरा वर्षांनंतर सरकार विरोधातील नाराजीचा फटका बसू शकतो. याबाबत आत्मचिंतन करावे लागेल व पराभवाची कारणे शोधावी लागतील,"

मोदी लाट ओसरली काय या प्रश्नाला खडसे यांनी थेट उत्तर दिले नाही. मात्र, ते म्हणाले, "लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी विकासाच्या नावावर मते मागितली होती. आज निवडणुका झालेल्या तिन्ही राज्यांत विकास झाला हे मतदारही मान्य करतात. मात्र, शेवटी मतदार राजा आहे. कुणाला मत द्यायचं कुणाला नाही हा त्याचा अधिकार आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख