सरकारवर अंकुश ठेवण्यात फडणवीस यशस्वी: खडसे

eknath khadse praises devendra fadavnis role as leader of opposition   
eknath khadse praises devendra fadavnis role as leader of opposition   

जळगाव : विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस हे सरकारवर अंकुश ठेवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत, या शब्दांत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना फडणवीसांचा कौतुक केले.

मुक्ताईनगर येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची जबाबदारी सद्यस्थितीत भाजपवर आलेली आहे. पूर्वी मी विरोधी पक्षनेता म्हणून पाच वर्षे काम खालच्या सभागृहात केले आहे. त्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर सरकारला धारेवर धरले,त्या माध्यमातून सरकारला धारेवर धरण्याचे काम मी करीत होतो. या अधिवेशात देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहेत. पुढच्या कालखंडात ते अधिक सक्षमतेने काम करतील. विरोधी पक्षनेता सत्ताधारी पक्षाएवढाच महत्वाचा आहे, सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्ष करीत असतो आणि आता तरी असे चित्र दिसते आहे विरोधी पक्ष नेते सरकारवर अंकुश ठेवण्यास बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com