विधानसभेत खडसेंच्या मदतीला विरोधक आले धावून

सायबर गुन्ह्यात सगळ्यात जास्त मला भोगावं लागलयं, सगळ्या देशात त्या भंगाळेमुळे माझी बदनामी झाली, आपल्या कुमकवत सायबर कायद्यांमुळे आरोपी पकडला असूनही तो मोकळा सुटला आहे, त्यामुळे कठोर कायदे करा - एकनाथ खडसे
विधानसभेत खडसेंच्या मदतीला विरोधक आले धावून

मुंबई : विधानसभेत राज्यातील सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सायबर सुरक्षा प्रकल्पाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी या प्रश्नाच्या चर्चेत प्रंचड गदारोळ झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही मंत्री रणजीत पाटील यांना धारेवर धरले. यावेळी खडसेंच्या मदतीला विरोधक धावून आले.

विधानसभेत आज काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सायबर गुन्ह्यांवर प्रश्न विचारला. या चर्चेत सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्याबाबत विरोधक व सत्ताधारी असे सगळेच अक्रमक झाले. याचर्चेत सत्ताधारी भाजप आमदार व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अक्रमकपणे सहभाग घेतला. खडसे म्हणाले, 'सायबर गुन्ह्यात सगळ्यात जास्त मला भोगावं लागलयं, सगळ्या देशात त्या भंगाळेमुळे माझी बदनामी झाली, आपल्या कुमकवत सायबर कायद्यांमुळे आरोपी पकडला असूनही तो मोकळा सुटला आहे, त्यामुळे कठोर कायदे करा.' असे सांगत एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री रणजीत पाटील यांना चांगलेच धारेवर धरले.

खडसेच्या वक्तव्याला काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार दुजोरा देत होते. या चर्चेत उत्तर देताना रणजीत पाटील यांची भंबेरी उडाली. रणजीत पाटील यांनी पोलीसांना या कायद्याचे शिक्षण ट्रेनिंगमध्ये देण्यात येते. राज्यात 47 सायबर लँबची स्थापना करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्याचवेळी सदस्यांनी कितीजणांना राज्याच्या सायबर कायद्याने सजा झाली ते सांगण्याचा आग्रह रणजीत पाटील यांच्याकडे धरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळाचे गटनेते अजित पवार यांनी हा प्रश्न राखून ठेवण्याची विनंती अध्यक्षांना केली. मात्र अजित पवारांची सुचना अमान्य करत प्रश्नोत्तरांची चर्चा सुरू ठेवण्यात आली.

एकनाथ खडसे यांच्यासंदर्भातील अन्य बातम्या -

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com