जळगाव- रावेरच्या भाजप शिष्टमंडळात खडसे -महाजन मुख्यमंत्र्यांना एकत्र भेटले 

खासदारांशी चर्चाजळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार ए.टी.पाटील व रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याशीही मतदार संघाच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. दोन्ही खासदारांनी मतदार संघातील कामाबात तसेच राजकीय स्थितीबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात आले.
BJP-Raver
BJP-Raver

जळगाव  : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघांच्या आढावा बैठकीला   गिरीश महाजन ,   जयकुमार रावल,  पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह एकनाथराव खडसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एकत्र भेटले . हे मोठे नेते एकत्र आल्याने भाजपचे जिल्ह्यातील अन्य नेतेही आनंदी दिसत होते . 

युती झाली नाही, तर भारतीय जनता पक्ष जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघ स्वबळावर लढण्यास सक्षम आहे.असा विश्‍वास दोन्ही मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकित व्यक्त केला असल्याचे सांगण्यात आले. 

राज्यात शिवसेना व भारतीय जनता पक्षच्या युतीबाबत तळ्यात-मळ्यात सुरू आहे. अशा स्थितीत युती झाली आणि नाही झाली तर काय?याबाबत आता भारतीय जनता पक्षातर्फे थेट मतदार संघ निहाय आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून घेण्यात येत आहे. 

याच अंतर्गत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या आढाव्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन माजी मंत्री एकनाथराव खडसे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील, आमदार सुरेश भोळे, खासदार ए.टी.पाटील, खासदार रक्षा खडसे,आमदार स्मिता वाघ,चंदूलाल पटेल, उन्मेश पाटील , आमदार संजय सावकारे, माजी आमदार गुरूमुख जगवानी,जिल्हा परिषद शिक्षण समितीसभापती पोपटतात्या भोळे, सुनिल नेवे, पी.सी.पाटील, आदी उपस्थित होते. 

बैठकित दोन्ही मतदार संघाचा सद्यस्थितीचा पदाधिकाऱ्याकंडून आढावा घेण्यात आला. युती झाली नाही झाली तर काय परिस्थिती राहिल? याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी युती नाही झाली तरी दोन्ही मतदार संघात भाजप स्वबळावर सक्षमपणे लढत देवून विजयी होईल असा विश्‍वास पदधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जळगाव लोकसभा मतदार संघातील काही भागात शिवसेनेचा प्रभाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले, मात्र स्वतंत्र लढल्यास त्या ठिकाणी भाजप लक्ष केंद्रीत करेल. असा विश्‍वासही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर रावेर लोकसभा मतदार संघात सर्वच विधानसभा क्षेत्रात भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com