Eknath khadse on bjp's failure to form alliance | Sarkarnama

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची एक-दोन वर्षे दिली असती तर मार्ग निघाला असता : खडसे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे : महायुतीला जनतेने मतदान केले होते. आम्ही दोन पावले मागे गेलो असतो आणि शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दाखविली असती तर मार्ग निघाला असता, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. 

पुणे : महायुतीला जनतेने मतदान केले होते. आम्ही दोन पावले मागे गेलो असतो आणि शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दाखविली असती तर मार्ग निघाला असता, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. खडसे म्हणाले, "महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनायला पाहिजे होते. जनतेनेही तसा कौल दिला होता. शिवसेनेशी चर्चा केली असती तर तडजोडीतून मार्ग निघू शकला असता. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष होते. आम्ही दोन पावले मागे गेले असतो तर चित्र वेगळे राहिले असते.'' 

आपली नाराजी पक्षावर आहे का ? असे विचारले असता खडसे म्हणाले, "पक्षावर माझा कसलाही राग नाही. जे नेतृत्व करतात, ज्यांनी निर्णय घेतले त्यांच्यावर माझा रोख आहे. यश माझे; अपयश दुसऱ्याचे, असे करून कसे चालेल? पराभवाची जबाबदारीही नेतृत्वाने घेतली पाहिजे.'' 

याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी घ्यावी का ? असे विचारले असता ते म्हणाले, की मला जे बोलायचे आहे ते मी बोललो आहे. त्यापेक्षा अधिक तपशिलात जाऊन बोलण्याची मला आवश्‍यक्ता वाटत नाही. विरोधी पक्षनेतेपदाच्या कामगिरीवर विचारले असता ते म्हणाले, की सरकार स्थापन होऊन आठच दिवस झाले आहेत. एवढ्या कमी काळात सरकारच्या कामाचे मुल्यमापन करणे शक्‍य नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख