आजचा वाढदिवस : एकनाथ खडसे (भाजप नेते, माजी महसूलमंत्री) - Eknath Khadse Birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : एकनाथ खडसे (भाजप नेते, माजी महसूलमंत्री)

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 सप्टेंबर 2018

ता.2 सप्टेबर -आजचा वाढदिवस - एकनाथ खडसे 

शेतकरी कुंटूबात जन्मलेले आमदार एकनाथराव खडसे भाजपचे नेते आहेत. विधानसभेवर सहा वेळा मुक्ताईनगर (जि.जळगाव) मतदार संघातून निवडून आले आहेत. सरपंच ते राज्याचा विरोधी पक्षनेता, मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एक लढवैय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

शेतकरी कुंटूबात जन्मलेले आमदार एकनाथराव खडसे भाजपचे नेते आहेत. विधानसभेवर सहा वेळा मुक्ताईनगर (जि.जळगाव) मतदार संघातून निवडून आले आहेत. सरपंच ते राज्याचा विरोधी पक्षनेता, मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एक लढवैय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिक ते शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी त्यांनी रस्त्यापासून तर थेट विधीमंडळात त्यांनी आवाज उठविला आहे. 

राज्य विधासभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी राज्यातील विविध प्रश्‍नाला त्यांनी वाचा फोडली आहे. या शिवाय सन 1997 मध्ये राज्याचे जलसंपदा मंत्रीपद त्यांच्याकडे असतांना त्यांनी कृष्णा खोरे, तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना करून सिचनांच्या कामांना गती दिली. सन 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत गेल्या पंचवीस वर्षापासून युती असलेल्या शिवसेनेशी युती तोडून भारतीय जनता पक्ष स्वातंत्र लढला आणि प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यात निवडून आला. त्यात त्यांचा वाटा मोठा होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती. 

मात्र त्यांना महसूल खात्यासह दहा खात्याचे मंत्रीपद देण्यात आले. त्यांनी मात्र अवघे दीड वर्षाच्या काळात गैरव्यवहाराच्या आरोपावरून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु त्यानंतर झालेल्या चौकशीत ते निर्दोष असल्याचा सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची मंत्रीमंडळात पुन्हा वर्णी लागण्याची प्रतिक्षा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख