Eknath_20Khadse_20Vinod_20Tawde
Eknath_20Khadse_20Vinod_20Tawde

नाथाभाऊंच्या जागी कन्या रोहिणीना संधी,तर तावडे -बावनकुळेंना जीवदान?

प्रकाश महेता यांच्याऐवजी पराग शहा किंवा प्रवीण छेडा यांचा विचार सुरू आहे.

मुंबई :  एकनाथ खडसे यांनी थांबावे असा सल्ला देत त्यांची कन्या रोहिणीला भाजपने उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे.


मात्र एकनाथ खडसेंना आपल्या राजकीय कारकीर्दीची अखेर सन्मानपूर्वक व्हावी असे वाटते आहे . खडसे यांच्याविषयी सहानुभूती असलेल्या काही नेत्यांनी नाथाभाऊला राज्यपाल तरी करावे असे यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे . मात्र सध्या तरी खडसेंना कन्येला मिळणाऱ्या तिकिटावर समाधान मानावे लागेल अशी चिन्हे आहेत . 


विनोद तावडे यांनी आजवर पक्षासाठी केलेले काम लक्षात घेत त्यांच्याविषयी जीवदानाचे धोरण अवलंबवले जाण्याची शक्यता आहे. विनोद तावडे यांनी अभाविपच्या दिवसांपासून संघटनेत काम केलेले आहे . शिवाय तावडे एकदमच बाजूला पडले तर आशिष शेलार यांची सुसाट वाटचाल सुरु होऊ शकते . तावडे यांचे महत्व राहिले तर मुबई भाजपत सत्तासमतोल कायम राहू शकेल असे काहींना वाटते . 


बावनकुळे यांना उमेदवारी मिळावी या साठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील आहेत असे समजते. बावनकुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुखांविरुद्ध लढण्याची संधी आग्रहपूर्वक दिली जाईल अशी चर्चा आहे .


प्रकाश महेता यांच्याऐवजी पराग शहा किंवा प्रवीण छेडा यांचा विचार सुरू आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com