Eknath Khadse Apporva Hire Meeting Could Not Happen | Sarkarnama

भाजपचे दोन असंतुष्ट खडसे- हिरे एकत्र येण्याचा मुहुर्त हुकला! 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठीचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला निमंत्रीत केले होते. मात्र खडसे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. मात्र, याचवेळी सिडकोतील भाजपचे नगरसेवक मुकेश शहाने आणि प्रतिभा पवार कार्यक्रमास उपस्थित राहिल्या. त्यामुळे त्याची चर्चा झालीच. 

नाशिक : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार डॉ. अपूर्व हिरे दोघेही भाजपमधील नाराज नेते आहेत. हे दोघे नेते नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील एका कार्यक्रमासाठी एकत्र येण्याचे नियोजन होते. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ अन्‌ स्थानिक नेत्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ऐनवेळी खासगी कामानिमित्त व्यग्र असल्याचा निरोप देत खडसे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे भाजप नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. 

माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठीचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला निमंत्रीत केले होते. मात्र खडसे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. मात्र, याचवेळी सिडकोतील भाजपचे नगरसेवक मुकेश शहाने आणि प्रतिभा पवार कार्यक्रमास उपस्थित राहिल्या. त्यामुळे त्याची चर्चा झालीच. 

कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वतीने दंत रुग्णाच्या सोयीसाठी सॅटेलाईट सेंटर आणि डॉ.अपूर्व हिरे मित्र मंडळातर्फे कार्यक्रम आयोजित केला होता. विशेषतः नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील जनसंपर्काचा तो भाग होता असे बोलले जाते. परिसरातील गरजू रुग्णांना आवश्‍यक साहित्य मोफत वापरण्यासाठी उफलब्ध करणे, बालकांसाठी मोफत लसीकरण सुविधा दिल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकांची धावपळ सुरु असल्याने अनेकांनी या कार्यक्रमाचा संबध राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. खडसेंच्या गैरहजेरीत माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. 

यावेळी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. देवरे, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, विश्वस्त डॉ.अद्वय हिरे, जिल्हा महिला विकास सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा डॉ.योगिताताई हिरे, डॉ. प्रदीप जी. एल., के. बी. एच. दंत महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.संजय भावसार आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख