ज्यांनी 2014 मध्ये अनेकांना उमेदवारी दिली ते खडसे, तावडे तिकिटासाठी `वेटिंग`वर

ज्यांनी 2014 मध्ये अनेकांना उमेदवारी दिली ते खडसे, तावडे तिकिटासाठी `वेटिंग`वर

पुणे : भाजपच्या पहिल्या यादीत सांस्कृतिमंत्री विनोद तावडे, एकनाथ खडसे, कामगार राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळ भेगडे यांची नावे नसल्याने खळबळ उडाली आहे.

तावडे यांचे नाव विलेपार्ले मतदारसंघातून तर खडसे यांचे मुक्ताईनगर येणे अपेक्षित होते. याच तावडे आणि खडसे यांनी 2014 मध्ये अनेकांना उमेदवारी मिळवून दिली होती. त्याच दोघांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खडसे यांनी तर शिवसेना आणि भाजप युती तोडल्याची घोषणा 2014 मध्ये केली होती. पुण्यातील अनेकांना 2014 मध्ये उमेदवारी देण्यात तावडे यांचा मोठा वाटा होता.

मावळमध्ये भेगडे यांच्याविरोधात सुनील शेळके यांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे भेगडे यांच्या नावाबाबत काय होणार, याची उत्सुकता आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश मेहता या दोन दिग्गज मंत्र्यांनाही पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांच्या चिंता वाढल्या आहेत. 

भाजपने 164 पैकी 125 उमेदवारांची पहिली यादी जारी केली. या यादीतील पहिले नाव हे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. ते नागपूर पश्चिम मधून निवडणूक लढविणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपाध्ये आलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचं नावही पहिल्या यादीतून वगळण्यात आलं आहे. तसेच विनोद तावडे प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव पहिल्या यादीत नाही.

पुण्यातून मेधा कुलकर्णी, विजय काळे. दिलीप कांबळे, बीडमधून संगिता ठोंबरे, आर. टी. देशमुख या आमदारांना पक्षाने परत संधी दिलेली नाही. : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत शहरातील आठही मतदारसंघावर ताबा कायम ठेवला आहे. शिवसेनेने दबाव तंत्र वापरले असले त्याचा काहीही फरक भाजपवर पडलेला नाही. पुण्यातील कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक, पर्वतीतून शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, वडगाव शेरीतून आमदार जगदीश मुळीक आणि खडकवासल्यातून आमदार भीमराव तापकीर यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात यश आले आहे. कॅन्टोन्मेंट मधून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या ऐवजी त्यांचे बंधू स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. 

शिवाजीनगरमध्ये माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र नगरसेवक सिद्धार्थ यांना उमेदवारी दिली आहे. काळे यांना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com