चंद्रकांत पाटलांना सहकार समजायला दुसरा जन्म घ्यावा लागेल : खडसे

...
eknath khadase refutes allegation by mla patil
eknath khadase refutes allegation by mla patil

जळगाव : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला फारशी किंमत आपण देत नाही, त्यांना सहकार आणि जिल्हा बॅंक समजायला दुसरा जन्म घ्यावा लागेल. कारखान्याला कर्ज दिल्यानेच आज बॅंक ही फायद्यात आहे. त्यामुळे त्यांनी अभ्यास करून आरोप करावा असा टोला माजी एकनाथराव खडसे यांनी लगावला आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले, कि कारखान्यांने जे कर्ज कर्ज घेतले आहे. त्याचे 40 कोटी रूपये व्याज भरले आहे. एकही हप्ता थकविलेला नाही. उलट कारखान्यानेच भाग भांडवल परत देण्याचा आग्रह केला आहे. जिल्हा बॅंकेचा व्यवहार अत्यंत पारदर्शी असून बॅक "अ'वर्गात आहे. शिवसेसेनेच आमदार किशोर पाटील हे बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. आमदार पाटील यांनी त्यांच्याकडूनच अगोदर माहिती घ्यायला हवी होती.कारखान्याने वीज निर्मीतीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम एमएसईबीला वीज विक्रीतून थेट "एक्‍स्क्रो'अकाउंटमध्ये जमा होत आहे. त्यामुळे हे अकाउंट काय हे सुध्दा त्यांनी समजावून घ्यावे.

मधुकरसाठी पाटलांनी थकहमी आणावी
मधुकर कारखान्याच्या कर्जाबाबतच्या आरोपावर बोलतांना खडसे म्हणाले, थकहमीशिवाय कोणालाही कर्ज देता येत नाही. त्यामुळे आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपले वजन वापरून मधुकर सहकारी साखर कारन्याची थकहमी शासनाकडून आणावी, असे खडसे यांनी सांगितले.

आमदार चंद्रकांत पाटील यांचे आरोप

जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत आरोप केला होता. जिल्हा बॅंकेतर्फे शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही, मात्र मुक्ताईनगर साखर कारखान्याला बेकायदेशीर कर्ज वितरण केले जात आहे. हा कारखाना एकनाथराव खडसे यांनी खरेदी केलेला आहे. त्याला कोणत्या आधारावर कर्ज दिले जात आहे. असा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

जळगाव येथील पद्‌मालय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा बॅंकेत एकनाथराव खडसे यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसे चेअरमन आहेत. तर संत मुक्ताई साखर कारखाना एकनाथराव खडसे व शिवाजी जाधव यांनी खरेदी केला आहे. हा कारखाना त्यांनी 49 कोटी रूपयाला खरेदी करण्यात आला. त्यावेळी त्याला 51 कोटी रूपये कर्ज देण्यात आले. त्यांनंतर 55 कोटी रूपये मालतारण कर्ज देण्यात आले. त्यानंतर पुन्हा आठ कोटी रूपये कर्ज देण्यात आले. आता पुन्हा 8196.00लाखाच्या कर्जासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. उद्या (ता.10) होणाऱ्या सभेत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. खासगी बॅंकेला एवढे कर्ज कसे मंजुर केले जात आहे. मधुकर सहकार कारखान्याला थकहमी दिली जात नाही. शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही. परंतु या कारखान्याला कोणत्या आधारावर कर्ज दिले जात आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे. हे सर्व कर्ज बेकादेशीर आहे. याबाबत आपण मुख्यंत्री उध्दव ठाकरे व सहकार मंत्र्याकडे तक्रार दाखल करणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com