eknath khadase reaction on election | Sarkarnama

सत्ता नसतानाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत आम्ही यशाचा पाया रचला : खडसे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 डिसेंबर 2018

जळगाव : भारतीय जनता पक्षाची फारशी ओळखही नव्हती, सत्ता नव्हती, पैसाही नव्हता अशा खडतर काळात आम्ही पक्षाचा प्रचार करून यश मिळविले अगदी जळगाव जिल्हा परिषदेवरही पक्षाची सत्ता आणली, त्या काळात आम्ही यशाचा पाया रचला त्यामुळेच आज जळगाव, धुळे महापालिकेतील यश मिळाले आहे. मिळालेल्या यशाचे आपण स्वागत करतो, असे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

धुळे महापालिका निवडणूकीतील यशाबाबत बोलताना ते म्हणाले, की धुळे महापालिकेच्या निवडणूका गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या त्याचे आपण स्वागतच केले आहे.परंतु ज्या काळात भाजपचा फारसा प्रभाव नव्हता, त्या काळात आम्ही पक्षाचे पाया करून यश मिळविले, गेल्या तेवीस वर्षापासून जिल्हा परिषद आमच्याच ताब्यात आहे. त्या काळात पक्षाकडे सत्ता नव्हती, आर्थिक पाठबळ नव्हते त्या काळात मिळविलेले यश मोठेच आहे. 

आज पक्षाकडे सत्ता आहे, आर्थिक पाठबळ आहे. त्यामुळे आजच्या यशाचा पाया पक्षाने सत्ता नसताना मिळविलेल्या यशात रचला आहे हे निश्‍चित आहे. मात्र पैशाने कोणत्याही निवडणूका जिकंता येत नाही हे तेवढेच सत्त्य आहे, असे असते तर या देशात टाटा, बिर्ला निवडून आले असते. व त्यांचीच सत्ता राहिली असती. परंतु तरीही यश हे यशच असते. त्याचे आपण अभिनंदन करतो असेही ते म्हणाले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख