खडसे यांना यापूर्वी कोअर कमिटीला बोलवण्यात आलं नाही हे खर : मुनगंटीवार

खडसे यांना यापूर्वी कोअर कमिटीला बोलवण्यात आलं नाही हे खर :  मुनगंटीवार

मुंबई : खडसे यांना यापूर्वी कोअर कमिटीला बोलवण्यात आलं नाही हे खर मात्र यापुढे बोलवण्यात येईल. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासोंबत चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. ते पक्षातून बाहेर पडणार नाही. आम्ही त्याची नाराजी दूर करू असा विश्वास राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. 

खडसे हे पक्षावर नाराज असल्याने ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खडसे यांनी काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. आज माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही ते भेटले आहेत. खडसे हे शिवसेनेत की राष्ट्रवादीत प्रवेश करणार याविषयी प्रश्‍न विचारले जात आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकिट नाकारले होते आणि त्यांच्या मुलीला तिकीट दिले होते. 

मात्र मुलगी रोहिणी यांचा पराभव झाल्याने ते संतप्त झाले आहेत. भाजपमधीलच काही मंडळींमुळे मुलीचा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पराभवाला जबाबादार असणाऱ्यांची नावेही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहेत. त्यांना कोअर कमिटीलाही बोलविले जात नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. 

यासर्व पार्श्‍वभूमीवर मुनगंटीवार म्हणाले, की खडसे यांना यापूर्वी कोअर कमिटीला बोलवण्यात आलं नाही हे खर मात्र यापुढे बोलवण्यात येईल. त्यांच्या मुलीच्या पराभवाला जे जबाबदार आहेत त्यांच्यांवर कठोर कारवाई केलीचं पाहिजे. एकनाथ खडसे , पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाही असा दावाही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com