मोकळे असल्याने एकनाथ खडसे गाजलेल्या राजकीय घडामोडींवर लिहिणार

कोणाला लक्ष्य करणार? तिकिट का कापले, याच्यावर प्रकाश टाकणार का?
मोकळे असल्याने एकनाथ खडसे गाजलेल्या राजकीय घडामोडींवर लिहिणार

जळगाव : जीवनात अनेक राजकीय घटना घडल्या आहेत त्याचा राज्यातील राजकारण परिणाम झाला असता. त्यावर आपण पुस्तक लिहीणार  आहोत अशी माहिती भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी दिली.

दिवाळीनिमित्त पत्रकारांशी चर्चा करताना ते बोलत होते. ते म्हणाले मला राजकीय जीवनावर लिहीणयासाठी अनेकांनी विचारणा केली मात्र त्या वेळी आपल्याकडे वेळ नव्हता आता आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे आता आपण लिखाण करणार आहोत. राज्यातील अनेक राजकीय घटनांचे आपण साक्षीदार आहोत. त्यातील काही राज्यातील राजकारणावर परिणाम करण्याऱ्या आहेत. त्याचेही लिखाण आपण करणार आहोत.``

युतीला  1999 मध्ये बहुमतासाठी दहा आमदार कमी पडत असताना त्यावेळी सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करावे अशी शिफारस घेऊन आपण नितिन गडकरींसोबत बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो होतो, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. दिवाळीनिमित्त जळगावातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. 

जुन्या स्मृती सांगताना त्यांनी हा किस्सा सांगितला. पण राज्याची सत्ता व्यापारी प्रवृत्तीच्या हाती सोपवायची नाही असे बाळासाहेबानी त्यावेळी बजावल्याचे खडसे यांनी सांगितले. खडसे याबाबत म्हणाले, ''1999मध्ये भाजप सेना युती म्हणून लढले, आणि काँग्रेस व् राष्ट्रवादी स्वतंत्रपणे. त्यावेळी युतीचे 135 आमदार निवडून आले होते, बहुमतासाठी 10 आमदारांची गरज होती. पण केवळ 2 -3 अपक्ष आमदारांच्या बळावर 145 चा आकडा गाठता येत नव्हता. त्यावेळी सुरेशदादा जैन यानी बहुमत कसे मिळवता येईल, हे नितिन गडकरीना पटवून दिले आणि तो प्रस्ताव जैन यांची मुख्यमंत्रीपदासाठीची शिफारस घेउन आम्ही मातोश्रीवर गेलो होतो.''

पण बाळासाहेबांनी त्यास नकार दिला. त्यावेळी त्यांची विचार करण्याची उंची किती श्रेष्ठ आहे हे समजले आणि त्यांचा आदर अधिक वाढला असेही खडसे म्हणाले. त्यावेळी जैन यांच्याशी टोकाचे मतभेद असूनही आपण केवळ युतीच्या मुख्यमंत्री व्हावा, म्हणून हा प्रयत्न केला. पण त्यानंतर तब्बल 15 वर्षे युतीचे सरकार येऊ शकले नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com