आमच्या विरुद्ध कट करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा पाच दिवसात पक्षांतर : एकनाथ खडसे

पक्षासाठी मी गेली चाळीस वर्षे कार्य केले.. मात्र, सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत आपल्या विरोधात केवळ षडयंत्र विनाकारण छळण्यात आले. माझा पक्षावर अजिबात रोष नाही.. परंतु षडयंत्र करणारे चार ते पाच जण आहेत. त्यांची नावेही आपण तक्रारीत दिली आहे. जर नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली तर आपण पक्षात राहू अन्यथा चार ते पाच दिवसात पक्षांतर करु, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे
Ekanath Khadase Final Warning to Bjp Leadership
Ekanath Khadase Final Warning to Bjp Leadership

जळगाव : पक्षासाठी मी गेली चाळीस वर्षे कार्य केले.. मात्र, सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत आपल्या विरोधात केवळ षडयंत्र विनाकारण छळण्यात आले. माझा पक्षावर अजिबात रोष नाही.. परंतु षडयंत्र करणारे चार ते पाच जण आहेत. त्यांची नावेही आपण तक्रारीत दिली आहे. जर नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली तर आपण पक्षात राहू अन्यथा चार ते पाच दिवसात पक्षांतर करु, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला.

नागपूर, दिल्ली येथून खडसे आज जळगावात आले. त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, ''आपला पक्षावर अथवा केंद्रीय नेत्यांवर कोणताही रोष नाही. परंतु, पक्षातील काही व्यक्तींवर राग आहे. ते पक्षात केवळ षडयंत्र रचत असतात. गेली चार वर्षे आपल्याविरूध्दही त्यांनी षडयंत्र रचून आपल्याला विनाकारण बदनाम केले. आपल्यावर आरोप करणे, आपल्या चौकशा लावणे, असा प्रकार केला. या लोकांविरूध्द आपण तक्रार केली आहे. त्यांची नावेही तक्रारीत दिली असून त्यासंबंधी सर्व पुरावेही दिले आहेत. त्यामुळे पक्षाने आता त्यांच्यावर कारवाई करावी. ज्यांच्यावर आपला रोष आहे, त्यांच्यासोबत काम कसे करणार?'' ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, अशा अन्य नेत्यांना पक्षात प्रवेश मिळतो, महत्त्वाचे स्थान मिळते. मग, मला डावलण्याचे कारण काय? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

..अन्यथा पक्षांतर
आपण आजही पक्षात असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, जर षडयंत्र रचणाऱ्या पक्षातील या लोकावर कारवाई केली तर ठिक अन्यथा आपण आपला वेगळा निर्णय घेणार आहोत. येत्या चार चे पाच दिवसात आपण पक्षांतर करणार आहोत. समर्थकांसह राज्यभरातील कार्यकर्त्यांचा आपल्यावर पक्षांतराचा मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे. त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यावाच लागणार आहे.

पवार, ठाकरेंबरोबर राजकीय चर्चा
नागपूर येथील नेत्यांच्या भेटीबाबत खडसे म्हणाले, होय.. मी शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांना भेटलो. त्यांच्यासोबत अन्य कामांबरोबरच राजकीय चर्चाही केली. तीनही पक्षांनी पक्षात प्रवेश देण्याची तयारीही दर्शविली आहे. मात्र, अद्याप आपण निर्णय घेतलेला नाही. लवकरच कोणत्या पक्षात जायचे त्याचा निर्णय घेणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com