शेती कर्जमाफीचे शासनाचे धोरण सुस्पष्ट नाही: एकनाथ खडसे 

शेती कर्जमाफीचे शासनाचे धोरण सुस्पष्ट नाही: एकनाथ खडसे 

जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली मात्र त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्या संभ्रम निर्माण झाला आहे. असे स्पष्ट मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. 

जळगाव जिल्हा बॅंकेच्या 103व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. बॅंकेला यावर्षी तब्बल 53 कोटी75 लाखाचा ढोबळ नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेची 103वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅंकेच्या आवारात आज अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, संचालक गुलाबराव देवकर, नानासाहेब देशमुख, सौ.तिलोत्तमा पाटील, राजेंद्र राठोड आदी उपस्थित होते. 

खडसे म्हणाले. की शेतकरी कर्जमाफीबाबत शासनाने धोरण स्पष्ट नसल्याने व्दिधा मन:स्थिती दिसून येत आहे.अगोदर एक लाख रूपयापर्यंतचे कर्जमाफीची घोषणा केली, त्यातही वेळोवेळी बदल केले त्यामुळे सहकारी बॅंका व त्यांच्या शेतकरी सभासदांना अद्यापही धोरण सुस्पष्ट झालेले नाही. शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले मात्र त्यावरील व्याज भरण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. शासन बॅकेकडे व्याज मागते, बॅंक शेतकऱ्यांकडे व्याज मागते, शेतकरी शासनाने कर्ज मुक्त केल्याचे सांगून व्याज शासनाकडून घ्यावे असे सांगत आहे. 

तब्बल 70 ते 75 कोटी रूपयाचे व्याज भरणे सहकारी बॅंकांना शक्‍य नाही. त्यामुळे या कर्जावरील व्याज आजही थकित आहे.त्यामुळे आजही शेतकरी कर्जमाफीचा हा संभ्रम कायम आहे. या व्याजामुळे आज सहकारी बॅंकाच्या एन.पी,ए.मध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ज्या बॅंकेच्या एनपीए5 टक्‍क्‍याच्या वर जातो त्या बॅंकाची आर्थिक स्थिती धोक्‍यात येते. त्यामुळे शासनाने कर्जावरील हे व्याज माफ करण्याचा निर्णय घेवून धोरण सुस्पष्ट करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील व्याजाबाबत शासनाने ताबडतोब निर्णय घ्यावा याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जळगाव येथे बुधवारी (ता.22) करणार असल्याचेही खडसे यावेळी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com