सहकारी संस्थेत राजकारण घुसल्यास त्याचे वाटोळे : खडसे 

सहकारी संस्थेत राजकारण घुसल्यास त्याचे वाटोळे : खडसे 

जळगाव : राजकारण बाजूला सारून काम केल्यास सहकारी संस्था चांगल्या चालतात, मात्र त्यात राजकारण घुसले कि त्याचे वाटोळे होते. असे परखड मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे बोलतांना व्यक्त केले. 

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या 42व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. 

 यावेळी बोलतांना एकनाथराव खडसे म्हणाले, कि राजकारणाचे सर्व विषय बाजूला ठेवून जर संस्था चालविल्या तर त्या अत्यंत चांगल्या चालतात, जळगाव जिल्हा सहकारी बॅंक व जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या ठिकाणी राजकारण न करता सर्वपक्षीय संचालक चांगल्या पध्दतीने काम करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही संस्था अत्यंत चांगल्या स्थितीत सुरू आहेत. 

जिल्हा दूध संघास यावषी 3 कोटी 11लाख रूपये नफा झालेला आहे. सभासदांना दहा टक्के लांभांश देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. संघातर्फे प्रतिदिन 3लाख 27हजार लिटर्स दूध संकलन करण्यात येत असून 494 कोटी रूपयांची वार्षिक उलाढाल होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी 5हजार लिटर्स दूध भुकटी पावडर पाठविण्यात आली आहे, तर जनावरांसाठी पशुखाद्यही पाठविण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल क्रेझी होम येथे आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा सौ.मंदाकिनी खडसे होत्या. तर आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी खासदार वसंतराव मोरे आदी संचालक तसेच सदस्य उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com