बाळासाहेब,आनंद दिघेंच्या आठवणीने एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला...! 

बाळासाहेब,आनंद दिघेंच्या आठवणीने एकनाथ शिंदेंचा कंठ दाटून आला...! 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आज पूर्ण होतंय, याचा प्रत्येक शिवसैनिकांला अभिमान असे सांगताना आज साहेब असते तर त्यांना आनंद झाला असता. साहेब आणि आनंद दिघेसाहेबांच्या आठवणींने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे भावुक झाले. त्यांचा कंठ दाटून आला. 

साहेबांनी सांगायचं आणि दिघे साहेबानी करून दाखवायचं हे समीकरणच होऊनच बसले होते. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री केले हे काही कमी नाही. आजचा आनंद माझ्यासाठी मोठा आहे.

साहेब नाहीत असे सांगताना शिंदे यांच्या डोळे पानावले होते. तरीही आपल्या भावनांना आवर घालून ते म्हणाले, की महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक स्थिर आणि जनकल्याणाचं सरकार आम्ही देणार आहोत. शिवसेनेतील मंत्रीपदाबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेचं घेतील महाविकास आघाडीत आता कोणीही नाराज नाही. अजित पवारांच्या मंत्रीपदाबाबतचा निर्णय शरद पवार घेतील सोनिया गांधी, मनमोहनसिं,राज ठाकरे आदी सर्वांना निमंत्रण दिलंय, सर्वांनी या सोहळ्यासाठी यावं, ही विनंती ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com