कबनूर नगरपरिषदेसाठी एकनाथ शिंदे, धैर्यशील माने यांच्यात चर्चा

कबनूर स्वतंत्र नगरपरिषद व्हावी, याबाबत खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक झाली. या मध्ये नगरपरिषद होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून, पुढील काही दिवसांत स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिले आहे
Disucussion Between Dhairyasheel Mane and Ekanath Shinde About Kabnur City Council
Disucussion Between Dhairyasheel Mane and Ekanath Shinde About Kabnur City Council

कबनूर : कबनूर स्वतंत्र नगरपरिषद व्हावी, याबाबत खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक झाली. या मध्ये नगरपरिषद होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून, पुढील काही दिवसांत स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिले आहे. 

कबनूर नगरपरिषद होण्यासाठी गावातील नागरिकांनीच पुढाकार घेऊन कृती समितीच्या माध्यमातून रास्ता रोको तसेच चार दिवस बेमुदत साखळी उपोषण केले होते. अनेक नेत्यांनी, तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी पाठिंबा व्यक्त करून कबनूर स्वतंत्र नगरपरिषद करण्यासाठी पाठिंबा दिला होता. यावेळी खासदार माने यांनी शिष्टाई करत नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर साखळी उपोषण तात्पुरते स्थगित केले होते.

त्यास अनुसरून मुंबईत मंत्रालयात कृती समितीचे दत्ता शिंदे, सागर कोले या प्रतिनिधीनींनी खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत नगरविकास मंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यामुळे कबनूर नगरपरिषद होण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com