जळगाव जिल्हा भाजपाध्यक्ष खडसे, महाजनांच्या संमतीने ठरणार

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड उद्या (ता.१०) होत आहे. भाजपचे माजी प्रदेशाधध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ही निवड होत आहे
Eknath Khadse Girish Mahajan To Decide Jalgaon Zilla Parishad President
Eknath Khadse Girish Mahajan To Decide Jalgaon Zilla Parishad President

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्या वाद आता शमण्याच्या मार्गावर आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपद दोघांच्या समतीने ठरविण्यात आले. आता पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दोघांच्या समतीनेच ठरण्याची शक्‍यता असून माजी आमदार हरिभाऊ जावळे, आमदार स्मिता वाघ व पी.सी.पाटील यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार याचीच उत्सुकता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड उद्या (ता.१०) होत आहे. भाजपचे माजी प्रदेशाधध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ही निवड होत आहे. माजी अध्यक्ष (कै.) उदय वाघ यांनी सहा वर्षे अध्यक्षपद भूषविले, त्यांच्या कार्यकाळात जिल्हयात पक्षाला चांगले यश मिळाले. जिल्हयात दोन्ही खासदार भाजपचे निवडून आले त्यामुळे केंद्रातील सत्तेला जिल्ह्यातूनही साथ मिळाली, त्यानंतर सन २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातून विधानसभेवर सात आमदार विजयी झाले होते. तर स्थानिक स्वराज्य संस्थेतूनही एक आमदार विजयी झाला होता. या शिवाय जिल्ह्यातील जिल्हा परिषद ताब्यात होतीच, महापालिकाही ताब्यात आली होती. मात्र याच काळात राज्य मंत्रीमंडळातून एकनाथराव खडसे यांचे पद गेल्यानंतर जिल्ह्यात पक्षात अंतगर्त फुट पडली खडसे व माजी मंत्री गिरीश महाजन यांचे दोन उघड झाले होते. त्याही परिस्थितीत अध्यक्षपद सांभाळण्याची तारेवरची कसरत त्यांनी केली.

त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्तपदावर जिल्हा प्रभारी अध्यक्षपदी डॉ.सजीव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता तीन वर्षासाठी जिल्हाध्यक्षपदासाठी निवड होत आहे. या पदासाठी पक्षातून माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे नाव प्रथम आहे. त्या शिवाय विद्यमान आमदार स्मिता वाघ,पी.सी.पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, या पदासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्या समंतीनेच नाव निश्‍चित होणार आहे.चर्चेतील तिघा नावाबाबत दोन्ही नेत्यांचा कोणताही आक्षेप नसण्याची शक्‍यता आहे. त्यात माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी पक्षाध्यक्षपद स्विकारण्याची तयारी दर्शविल्यास त्यांच्या नावावर एकमत होवून त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com