शरद पवार यांच्या वाढदिवशी ८० लाखाचा निधी बळीराजाला देणार

शरद पवार यांच्या वाढदिवशी ८० लाखाचा निधी बळीराजाला देणार

पिंपरीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस (ता.१२) यावर्षी पक्षाच्या वतीने बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच ते ८० व्या वर्षात पदार्पण करत असल्याने ८० लाखाचा बळीराजा कृतज्ञता निधी तयार करुन तो शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

सदर कोष राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून अडचणीतील शेतकर्‍यांपर्यंत पोचवण्यात येणार आहे,अशी माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकारपरिषदेत दिली.वर्षभर हा कार्यक्रम होणार आहे असे ते म्हणाले. 

वाढदिवसानिमित्त शरद पवार शुभेच्छा स्वीकारणार आहेत. ते पुष्पगुच्छ, पुष्पहार स्वीकारणार नाहीत. तो निधी कृतज्ञता कोषात जमा केला जाणार आहे. असा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे.

युवक राष्ट्रवादी विकास आणि परिवर्तनाचा महानेता या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यानिमित्त जाणार आहे.संपुर्ण मुंबईतील रुग्णालयात फळवाटप केले जाणार आहे.तर,मुंबई युवकच्या वतीने ११ ते २० डिसेंबरपर्यंत सर्व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com