पुढाऱ्यांना गावबंदीचे वारे नाशिक जिल्ह्याच्या आठ गावांमध्ये

तिसगावला नुकताच ग्रामसभेत झाडी-एरंडगाव कालव्यासाठी राजकीय नेते, शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदीचा ठराव झाला. त्याची पुनरावृत्ती सांगवी गावात झाली. हरिसिंग ठोसे, दिनेश आहेर, रूपेश होलाडे, प्रकाश चव्हाण, मिलिंद शेवाळे, दीपक ठोके, निर्मला ठोके यांनी त्यासाठी गावोगावी फिरून जागृती केली आहे. येथील आमदार डॉ. राहुल आहेर अन्‌ सलग तीन वेळा खासदार झालेले हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या मतदारसंघातील ही गावबंदी आहे. नार-पार, पश्‍चिमवाहिनी नद्यांचे कालवे, गुजरातला जाणारे पाणी अडविणे, वळण बंधारे हे विषय याच भागात धगधगत आहेत.
Dr. Rahul Aher-Harishchandra Chavan
Dr. Rahul Aher-Harishchandra Chavan

नाशिक - झाडी-एरंडगाव कालवा ही चाळीस वर्षांपासून प्रत्येक राजकीय पक्ष, नेत्यांची आवडती घोषणा. त्याची वाट पाहून कंटाळलेले युवक पक्षभेद विसरून एकत्र आले. त्यांनी तिसगावला पुढाऱ्यांना गावबंदीचा ठराव केला. हे गाव भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांचे. येथील आमदार डॉ. राहूल आहेर अन्‌ खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण देखील भाजपचेच. गावबंदीचे हे वारे आता आठ गावांत घोंगावत असल्याने भाजपची चांगलीच झोप उडाली आहे. 

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी या घोषणा अनेकदा झाल्या. त्याचा इतिहास खूप जुना असावा. मात्र तो चर्चेत आला तो 1990 च्या सुमारास शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने नाशिक जिल्ह्यात गावागावात तसे फलक लावल्यावर. या घोषणेने राज्याचे राजकारण हादरले होते. यंदा त्याची एक झलक तिसगाव येथे दिसली. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी परिसराच्या विकासासाठी झाडी-एरंडगाव कालव्याचा प्रस्ताव मांडला. त्याची कार्यवाही सुरू झाली. मात्र, त्यांचे निधन झाले. त्यानंतर पुढे प्रत्येक निवडणुकीत जाहीरनाम्यात, भाषणांत या कालव्याच्या घोषणा होत असतात.

माजी मंत्री (कै.) ए. टी. पवार यांनीदेखील या मुद्द्यावर अनेकदा निवडणूक लढविली. महत्प्रयासाने तत्कालीन कळवण मतदारसंघाच्या पूर्व भागात म्हणजे आताच्या देवळा तालुक्‍यात या कालव्याचे पाणी पोचले. चांदवडचे बहुचर्चित दिवंगत आमदार जयचंद कासलीवाल यांनी तर गावोगावी जाऊन यावर मते मागितली. सलग तीन वेळा ते आमदार झाले. 2014 च्या निवडणुकीतही ही घोषणा होतीच. मात्र, प्रत्यक्ष कालवा होईल याची चिन्हे नाहीत. नवी पिढी त्याला कंटाळली. त्यांनी गेला महिनाभर त्यावर सोशल मीडिया आणि व्हॉट्‌सऍपवर मोहीम केली. युवक पक्ष विसरून एकत्र आले. राजकारणाने कूस बदलली. 

तिसगावला नुकताच ग्रामसभेत झाडी-एरंडगाव कालव्यासाठी राजकीय नेते, शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदीचा ठराव झाला. त्याची पुनरावृत्ती सांगवी गावात झाली. हरिसिंग ठोसे, दिनेश आहेर, रूपेश होलाडे, प्रकाश चव्हाण, मिलिंद शेवाळे, दीपक ठोके, निर्मला ठोके यांनी त्यासाठी गावोगावी फिरून जागृती केली आहे. येथील आमदार डॉ. राहुल आहेर अन्‌ सलग तीन वेळा खासदार झालेले हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या मतदारसंघातील ही गावबंदी आहे. नार-पार, पश्‍चिमवाहिनी नद्यांचे कालवे, गुजरातला जाणारे पाणी अडविणे, वळण बंधारे हे विषय याच भागात धगधगत आहेत. त्यातही असाच कल आहे. अन्य आठ गावांत गावबंदी व्हावी, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हे रोखायचे कसे, यावर भाजप नेत्यांत खल सुरू आहे. 

झाडी-एरंडगाव कालव्याने या भागात सिंचनाची सोय होईल. नोकरी, रोजगार मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नवी पिढी दिशाहीन आहे. त्यांना शेती करायची तर सुविधा हव्यात. तसे होत नसल्याने त्यांच्या नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसू शकतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा लाभ उठवू शकते. त्यामुळे आमदार राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री ते जलसंपदा विभागापर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळे निविदांसाठी का होईना प्रशासन हलले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com