सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहनचालक चांगले वाहन चालवितात: गडकरी  

राष्ट्रीय मोटार वाहन कायदा करण्यात आला असून वाहनचालकाच्या परवान्यातून शिक्षणाची अट काढण्यात आली आहे.-नितीन गडकरी
nitin_gadkari
nitin_gadkari

वाशी: सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहनचालकही चांगले वाहन चालवितात. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रीय मोटार वाहन कायदा करण्यात आला असून वाहनचालकाच्या परवान्यातून शिक्षणाची अट काढण्यात आली आहे. त्याचा फायदा दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या नागरिकांना होणार असून त्यामुळे देशात असलेल्या 25 लाख चालकांची उणीव भरून निघेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

हिंदुस्थान बस ऑपरेटर महासंघाच्या वतीने वाशी येथील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रवास- 2019 या प्रदर्शनावेळी ते बोलत होते.

प्रदूषण कमी करण्यासाठी देशात यापुढे इलेक्‍ट्रिक, बायो-सीएनजी आणि इथेनॉल या इंधनांचा वापर करण्यात येणार आहे. नागपूर परिसरात बायो-सीएनजीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भातील सहा जिल्हे येत्या काही वर्षांत डिझेलमुक्त होणार आहेत. मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस-वेच्या धर्तीवर मुंबई-दिल्ली हा एक्‍स्प्रेस-वे तयार करण्यात येणार आहे; मात्र हा मार्ग इलेक्‍ट्रिक असणार आहे. 

त्यामुळे इंधनामध्ये मोठी बचत होणार असून हे अंतर बारा तासांमध्ये वाहनांना पार करता येणार आहे. इलेक्‍ट्रिक रिक्षा, इलेक्‍ट्रिक कार, इलेक्‍ट्रिक टॅक्‍सी आणि इलेक्‍ट्रिक बसेस आदी वाहनांची सर्वच परमिटमधून मुक्तता करण्यात आली आहे, असेही गडकरी यांनी या वेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, के. टी. राजशेखर, प्रसन्न पटवर्धन, के. अफझल, रोहित श्रीवास्तव, सुभाष गोयल, हर्ष कोटक, दीपक नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com