शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या सुचिता पाटेकर परभणीला तर  मिनाक्षी राऊत पुण्याला  - Education officers transferred | Politics Marathi News - Sarkarnama

शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या सुचिता पाटेकर परभणीला तर  मिनाक्षी राऊत पुण्याला 

सरकारनामा
गुरुवार, 30 मे 2019

..

यवतमाळ :  महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-अमधील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात यवतमाळच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांचाही समावेश आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी (ता.30) जिल्हा परिषदेत धडकले.

जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास पंडित महाजन यांची बदली नाशिक येथे झाली असून, तेथे शिक्षणाधिकारी महानगरपालिका म्हणून प्रतिनियुक्ती मिळाली.

 अहमदनगरच्या  शिक्षणाधिकारी (निरंतर) सुनंदा भागाजी ठुबे यांची सांगली जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून वर्णी लागली. 

परभणी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा बालाजी गरुड यांची यवतमाळच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली आहे.

 सहायक संचालक विभागीय शिक्षण उपसंचालक सुधाकर तेलंग (लातूर) यांची सांगलीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे. 

सांगलीच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांची सिंधुदुर्ग येथे माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली आहे. 

यवतमाळच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता रमेश रोडगे-पाटेकर यांची परभणी येथे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

 गोंदियाचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांची वर्धा येथे माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली आहे.

 सहायक शिक्षण संचालक मिनाक्षी राऊत यांची महानगरपालिका शिक्षणाधिकारी पुणे येथे बदली करण्यात आली आहे. 

औरंगाबादच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांची पालघरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी बदली झाली आहे. 

विभागीय सहसचिव मुंबई विभागीय मंडळ डॉ. सुभाष बोरसे यांची धुळे येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

 ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी उर्मिला पारघे यांना मिरा-भाईंदर येथे शिक्षणाधिकारी म्हणून प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. 

जळगावचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांची जळगाव येथेच माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख