रामदास आठवले म्हणतात,'इडी'ने शरद पवारांची चौकशी करू नये 

कॉंग्रेस पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात विलीन करावा ,असे एका प्रश्नाचे उत्तर देताना श्री. आठवले म्हणाले .
Pawar_Athawale
Pawar_Athawale

नाशिक : राज्य सहकारी बॅंकेशी संबंधीत प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काहीही संबंध नाही. ते त्या संस्थेचे संचालक देखील नाहीत. त्यामुळे 'इडी'ने त्यांची चौकशी करु नये. कोणी तरी काहीही तक्रार करतो व त्यावर लगेच 'इडी' सक्रीय होते. यापेक्षा त्यांनी आधी पुरेशी माहिती घ्यावी , असा सल्ला  केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला आणि ईडीला दिला . 


ईडीतर्फे शरद पवार यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असतं रामदास आठवले बोलत होते . ते म्हणाले, शरद पवार राज्य सहकारी बँकेचे संचालक नाहीत. बँकेच्या वित्तपुरवठा विषयक धोरणाशी त्यांचा संबंध नाही . त्यामुळे ईडीने त्यांची चौकशी करायलाच  नको. कोणीही उठतो आणि काहीही तक्रार करतो म्हणून त्याची दाखल घ्यायची गरज नव्हती . ठोस पुरावे हातात असल्याशिवाय माहिती असल्याशिवाय असे पाऊल उचलायला नको होते . 

पक्षाबाबत बोलताना आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला विधीमंडळात कार्यालयासाठी जागा मिळणार आहे. येत्या निवडणूकीत आमचे पाच उमेदवार विजयी होतील. या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाचे चिन्ह घेतले असले तरीही ते आमचेच आहेत. आमचेच राहतील. त्यामुळेआम्हाला विजयाची खात्री आहे. कारण यावेळेला शिवसेनाही आमच्या सोबत आहे. या निवडणुकीत बंडखोरीचा सर्व ठिकाणी फटका बसणार नाही. निवडून आले तरी बंडखोर पुन्हा आमच्याकडेच येतील. राज्यात सत्तेत आल्यावर यंदा आम्हाला चार महामंडळे मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तसे सांगितले आहे. आम्हालाही सत्तेचा वाटा मिळणार आहे.

राज ठाकरेंना टोला लागवताना ते  म्हणाले, राज ठाकरे चांगले वक्ते आहेत. ते सतत बातम्यांत असतात. त्यांना यंदा विरोधी पक्ष व्हायचे आहे. त्यामुळे ते सारखे दुरचित्रवाहिन्यांवर झळकत असतात. मात्र त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही प्रभाव नाही, त्यांची तेवढी ताकद नाही. एव्हढेच काय विरोधी पक्ष म्हणून त्यांना संधी मिळणार नाही . 


 कॉंग्रेस पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात विलीन करावा ,असे एका प्रश्नाचे उत्तर देताना श्री. आठवले म्हणाले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com