`ईडी'ने महाराष्ट्राची माफी मागावी - विजय वडेट्टीवार

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याची पूर्ण तयारी केली होती. पण त्यांना ईडी कार्यालयात येण्याची गरज नाही, असे म्हणत घुमजाव करणाऱ्या ईडीने आता महाराष्ट्राची माफी मागावी. निष्पक्षपणे चौकशी केली असती तर हे प्रकरण बुमरॅंग झाले नसते, असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज "सरकारनामा'शी बोलताना म्हणाले.
विजय वड्डेटीवार
विजय वड्डेटीवार

नागपूर - आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याची पूर्ण तयारी केली होती. पण त्यांना ईडी कार्यालयात येण्याची गरज नाही, असे म्हणत घुमजाव करणाऱ्या ईडीने आता महाराष्ट्राची माफी मागावी. निष्पक्षपणे चौकशी केली असती तर हे प्रकरण बुमरॅंग झाले नसते, असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज "सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. 

"अति तिथं माती' ही म्हण सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.

पाच-सहा दशक राजकीय, सामाजिक जीवनात यशस्वीपणे काम करणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचे चारित्र्यहणन केले गेले आहे. हे करण्यामागे मोठे षड्यंत्र आहे. शरद पवारांच्या सभांना प्रचंड गर्दी होतेय. त्यांच्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. पाच-पाच, सहा- सहा किलोमीटरच्या रॅली त्यांच्या निघत आहेत. हे बघून सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. त्यांना भिती वाटत आहे. त्यामुळे हे षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 

पवारांचा दोष नसताना ईडीने गुन्हा दाखल करण्याचे धाडस केले कसे, असा प्रश्‍न करीत हे प्रकरण त्यांच्यावर चांगलेच शेकणार आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. त्यामुळे "अति तिथं माती' ही म्हण सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावी, असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

भाजप म्हणजे रामभरोसे हिंदू हॉटेल
भारतीय जनता पक्ष म्हणे रामभरोसे हिंदू हॉटेल आहे. काम काही करायच नाही आणि बाता मारत राज्यभर फिरायच आणि जनतेची दिशाभूल करायची. ही यांची वृत्ती आहे. हल्ली जी चुक सत्ताधाऱ्यांनी केली, ही त्यांनी भोगावी लागणार आहे. लवकरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नेते एकत्र बसून याप्रकरणी पुढील दिशा ठरवणार आहेत. अशा चुका करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com