राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या `या` अधिकाऱ्याने आपले फेसबुक अकाऊन्ट केले डिलीट

ed officer who interrogate raj deletes his Facebook account
ed officer who interrogate raj deletes his Facebook account

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ईडीचे (सक्तवसुली संचालनालय) सहायक संचालक राणा बॅनर्जी यांनी तब्बल साडेआठ तास चौकशी केली. बॅनर्जी यांच्याच स्वाक्षरीने ठाकरे यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. राज यांना पुन्हा गरज पडल्यास चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.

मुंबईतील अनेक हायप्रोफाईल केसचा तपास ईडीकडे आहे. आयएल अॅंड एफएस, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा गाजलेल्या तपासासह कोहिनूर मिल प्रकरणातील मनी लाॅंडगिंरचा (पैसा सफेद करणे) तपास मुंबईतील अधिकारी करीत आहेत. सहायक संचालक म्हणून नियुक्त असलेल्या बॅनर्जी यांनीच उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांना बारा तासांहून अधिक काळ चौकशी करत त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला होता. मूळचे कस्टम खात्यातील असलेले प्रतिनियुक्तीवर ईडीत आहेत.

बॅनर्जी यांचे नाव राज यांच्या नोटिशीत आल्यानंतर त्यांच्याविषयी अनेकांनी सोशल मिडियात जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांचे फेसबुक अकाऊंट सकाळपर्य़ंत दिसून येत होते. त्यावर ईडीतील अनेक अधिकारी मित्र असल्याचे दिसत होते. तसेच बॅनर्जी यांचा राजकीय कलही शोधण्याचा प्रयत्न त्यातून अनेकांनी केला. बॅनर्जी यांनी लाइक केलेल्या पेजेसमध्ये अमित शहा यांचेही पेज असल्याचा स्क्रिन शाॅट सोशल मिडियात फिरला. त्यावरून काहींनी त्यांचा थेट भाजपशी संबंध असल्याचे जोडत टिप्पण्या केल्या. काही वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या फोटोसह बॅनर्जी यांची बातमी दिली. काही कालावधीनंतर बॅनर्जी यांचे फेसबुक अकाऊंट डिलीट झाल्याचे लक्षात आले. दुपारपर्य़ंत दिसणारे बॅनर्जी यांचे अकौंट दिसणे नंतर बंद झाले. 

आर्थिक गुन्ह्यांचा तपास बराच किचकट असतो. त्यामुळे बराच संयम ठेवून तपास करावा लागतो. त्यात राजकीय नेते असतील तर त्यांना बोलते करण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापराव्या लागतात. बॅनर्जी यांनी राज यांच्याकडून काय आणि कशी माहिती घेतली, याची उत्सुकता आगामी काळात राहील. त्यांनी राज यांना तब्बल 35 प्रश्न विचारल्याचे सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com