सीबीआय, ईडी, प्राप्तिकर, पोलिसांमार्फत भाजपचा विरोधकांवर दबाब, संजय राऊतांना घणाघात 

सीबीआय, ईडी, प्राप्तिकर, पोलिसांमार्फत भाजपचा विरोधकांवर दबाब, संजय राऊतांना घणाघात 

मुंबई : ""सीबीआय, ईडी, प्राप्तिकर, पोलिस यांच्यामार्फत भाजप हा कार्यकर्त्यांवर दबाव आणत आहे. शिवाय, राखीव खेळाडू म्हणून राष्ट्रपती, राज्यपाल हेही आहेतच असे स्पष्ट करतानाच महाआघाडीसोबत सध्याच्या घडीला 165 आमदार आहेत असा दावा करीत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर शरसंधान साधले. 

अजित पवार यांच्या मागोमाग पाच आमदार गेल्याने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्याकडचे संख्याबळ कमी झाले आहे. महाविकास आघाडीकडून 170 चे संख्याबळ सांगितले जात होते; ते कमी झाले असून, आता महाआघाडीकडे 165 आमदार असल्याचा दावा राऊत यांनी केला. 

अजित पवार यांना फोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजपचा डाव त्यांच्यावरच उलटला असल्याची टीका त्यांनी केली. त्यांच्या हाताला लागलेले चार-पाच आमदारही परतीच्या वाटेवर असल्याचा दावा राऊत यांनी केला. 

भाजपने लपूनछपून उरकलेल्या शपथविधीच्या कार्यक्रमावर राऊत यांनी आज पुन्हा शरसंधान साधले. ""मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला विश्वासात न घेता शपथ घेणे म्हणजे राज्यासाठी व देशासाठी हा काळा दिवस आहे. देशातील कोणत्याही राज्याने असा काळा दिवस याआधी पाहिला नव्हता,'' असा राग राऊत यांनी व्यक्त केला. 
""भाजपने सचोटीने व्यापार करायला हवा होता. 

अजित पवारांना सोबत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. हे त्यांच्या अंगलट येणार आहे. राष्ट्रवादीचे जवळपास सर्व आमदार परतले आहेत. अजित पवार यांच्याकडे आता केवळ तीन ते चार आमदार उरले आहेत. या तीन ते चार आमदारांच्या बदल्यात भाजपने अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद दिले असावे,'' असा टोला संजय राऊत यांनी लगावला. अजित पवारांना फोडणे हा भाजपचा अखेरचा डाव होता व हा डाव भाजपवर उलटला आहे. त्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे राऊत म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com