वाधवान कुटुंब शाळेत मुक्कामाला : अलिशान गाड्या `ईडी`ने ताब्यात घेतल्या आणि पाचगणी ठाण्यात लावल्या

अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय या दोन्ही संस्था आता वाधवान यांचे होम क्वारंटाईन संपण्याचे वाट पाहत आहेत.
wadhwan-vehicles
wadhwan-vehicles

भिलार : महाबळेश्वर येथील बंगल्यात राहण्यासाठी पुणे आणि सातारा जिल्हाच्या सीमा ओलांडत टाळेबंदी तोडून आलेले डीएचएफएल उद्योगसमूहाचे वाधवान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नऊ जण आणि त्यांचे 14 नोकरचाकर असे एकूण 23 जण पाचगणीती  सेंट झेविअर्स हयस्कुलच्या इमारतीत इन्स्टीटयुशनल होम क्वारंटाईन झाले आहेत.

त्यांच्या गाड्याही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) सांगितल्यानुसार सातारा पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्या पाचगणी पोलिस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. याबाबत साताऱ्याचे पोलिस अधीक्षक यांना सूचना करण्यात आली होती. या चार गाड्या पोलिस ठाण्यात दिसत असून त्यात दोन रेंज रोव्हर आणि दोन फाॅर्च्यूनर आहेत. नोटीसमध्ये पाच गाड्यांचा उल्लेख आहे. त्यात तीन फाॅर्च्यूनर असल्याचे म्हटले आहे.  प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाॅंडरिंग अॅक्टनुसार ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या चारही गाड्या वाधवान बंधूंच्या असल्याचे नोटिशीत म्हटल्याचे वृत्ती पीटीआयने दिले आहे.

वाधवान यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे एक पथक पोहोचले होते. मात्र क्वारंटाईन असलेल्या वाधवान यांची चौकशी करता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ते निघून गेेले. मात्र स्थानिक पोलिसांना बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 

वाधवान कुटुंबीयांचा दिवाण हाऊस म्हणून येथे बंगला आहे. तो सोडून त्यांना आता शाळेत राहावे लागत आहे. ज्या दिवशी वाधवान कुटुंबियांनी खंडाळा सोडले त्याच दिवशी डीएचएफएल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन पीएम-केअर फंडाला दिल्याचे कंपनीने घोषित केले होते.

गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटरहेडवर वाधवान कुटुंबियांना संचारबंदी मोडली होती. त्य गुप्ता यांची आता चौकशी सुरू आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. 

गृह सचिवांचे परवानगीचे पत्र सोबत असल्याने वाधवान यांना कोणीअडविले नाही. विनात्रास त्यांचा प्रवास झाला व गुरूवारी रात्री ते महाबळेश्वर येथील आपल्या बंगल्यात दाखल झाले. महाबळेश्वर मध्ये प्रवेश केल्यानंतर ही खबर पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने ही माहीती तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांना कळविली व सर्व प्रशासन खडबडुन जागे झाले. जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन करून जर कोणी जिल्हयात दाखल झाले तर, अशा लोकांच्या बाबतीत काय करायचे या बाबत राज्य शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या नुसार जिल्हा प्रशासनाने या उदयोगपतीचे संपुर्ण कुटूंब क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार तहसीलदार सुषमा चौधरी पाटील या शुक्रवारी सकाळी त्यांच्या बंगल्यावर  आपले कर्मचारी यांचे समवेत तसेच वैदयकिय अधिकारी व कर्मचारी यांचे पथक पालिकेचे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील व त्यांचे कर्मचारी असा लवाजमा घेवुन दाखल झाल्या नंतर बंगला बंद करण्यात आला. बंगल्यातील सर्वांची ग्रामिण रूग्णालयातील वैदयकिय अधिकारी डॉ. राजीव शहा व डॉ. आदर्श नायर यांनी तपासणी केली. या तपासणी मध्ये कोणालाही कोरोनाची बाधा झाल्याची लक्षणे आढळली नाही त्या मुळे प्रशासनाचा जीव भांडयात पडला. तहसिलदार चौधरी पाटील यांनी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची माहीती उदयोगपतीला दिली.  प्रथम पुढे मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांची गाडी त्या नंतर रूग्णालयाची रूग्णवाहीका त्या मागे ओळीने उदयोगती व त्यांच्या कुटूंबाच्या सहा आलिशान गाडया त्या मागे पोलिस गाडी व सर्वांत शेवटी तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांची गाडी असा वाहनांचा ताफा दुपारी पाचगणी येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तयार केलेल्या सेंट झेविअर्स या खास इमारतीत पोहोचला. याच ठिकाणी उदयोगपतीचे संपुर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता पुढील १४ दिवस याच इमारतीमध्ये या वाधवान कुटुंबाचा मुक्काम असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com