Easter Freeway to be Named After Vilasrao Deshmukh | Sarkarnama

'इस्टर्न फ्री वे'ला विलासराव देशमुखांचे नाव

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबई : मुंबईतील 'ईस्टर्न फ्री वे'ला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नगरविकास विभागाला केली.

राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसूलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक मंगळवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या वेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पवार यांनी राज्यातील परिवहन सेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा आणि ईस्टर्न फ्री वेच्या उभारणीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन या मार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. 

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचे होणारे अपघात आणि नागरिकांमध्ये त्याबाबत असलेल्या नाराजीची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेशही पवार यांनी दिले. वाहन अपघात रोखण्यासाठी मोटार वाहतूक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी परिवहन विभागाला दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख