eaknath shinde | Sarkarnama

कर्जमुक्ती हाच आमचा प्राधान्याचा विषय - एकनाथ शिंदे

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनामा न्यूज ब्युरो
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई, ता.31: शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय असून आम्ही आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा सुरू राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि विधीमंडळात त्याबाबतचे आश्वासन दिलं आहे, असे शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवसेना मंत्री आणि आमदारांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली त्यानंतर एकनाथ शिंदे बोलत होते. 

शिंदे पुढे म्हणाले, शिवसेना आमदारांच्या विकासनिधीसंदर्भात समतोल साधला जाईल. ज्या मतदारांनी निवडून दिले आहे. त्यांची विकासकामे करणे ही माफक अपेक्षा आहे. त्यासाठीच आमचीही प्रमुख मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. यापुढे शिवसेनेच्या कुठल्याच आमदाराची नाराजी राहणार नाही, असा प्रयत्न मी करेन असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

यावेळी शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. याबाबत मंत्री रामदास कदम यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आज ठोस आश्वासन दिले आहे. निधी वाटपाबद्दल कोणावरही अन्याय करणार नाही. हे सरकार शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे. यापूर्वी भाजपच्या आमदारांना जास्त निधी आणि शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला जात होता. आता यापुढे शिवसेना - भाजपच्या आमदारांना समान निधी वाटप केले जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास आहे. अर्थसंकल्पात जी नाराजी होती ती आता दूर झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीवर सभागृहात आश्वासन दिलेलं आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान, काल ( गुरूवार ) शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक "मातोश्री" या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला मंत्री दीपक केसरकर, रामदास कदम, दिवाकर रावते, दीपक सावंत, विजय शिवतरे, संजय राठोड, अर्जुन खोतकर, दादा भुसे आदी उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटून सेना भाजपच्या वाढत असलेल्या तणावावर चर्चा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आज शिवसेना मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख