खडसे यांनी उपरोधिकपणाने मानले फडणवीस यांचे आभार ...

आपण मंत्री असताना औरंगाबाद येथील दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन विभागाची जागा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी दिली होती. परंतु, नंतर पाच वर्षांच्या काळात स्मारक उभारले नसल्याचा आरोप यापूर्वीही आणि आजही एकनाथ खडसे यांनी केला.
 खडसे यांनी उपरोधिकपणाने मानले फडणवीस यांचे आभार ...

परळी (जि. बीड) : देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि तिसऱ्या दिवशी त्यांना राजीनामाही द्यावा लागला. याबाबत पक्षांतर्गत आणि विरोधकांच्या टीकेचे धनी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे आज खडसे यांनी उपरोधिकपणे आभार मानले. ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले ते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक मार्गी लावण्यासाठीच असे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

फडणवीस केवळ लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठीच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याचे ते म्हणाले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी आपण मंत्री असताना दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन विभागाची जागा दिली होती. त्यांच्या नावाने अपघात विमा योजनाही आपल्याच आग्रहाने कॅबीनेटमध्ये मंजूर झाली. मात्र, आपण मंत्रीपदावरुन गेल्यानंतर भाजप सरकारकडून स्मारकासाठी काहीच झाले नाही अशी थेट टीका त्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. 

या स्मारकासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा ता.23 रोजी मुख्यमंत्री झाले. ता. 24 ला त्यांनी जागेच्या मंजुरीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आणि ता. 25 नोव्हेंबरला स्मारकाचे कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर पुन्हा ता. 26 ला फडणवीस यांनी राजीनामा दिल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. त्यामुळे फडणवीसांनी केवळ मुंडे यांच्यासाठी पुन्हा सत्तेवर आले असा टोला लगावत त्यासाठी त्यांचे आभार मानतो असेही ते उपरोधाने म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com