eaknath khadase and maratha reservation | Sarkarnama

मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारा सत्ताधारी पक्षातला मी पहिला आमदार : खडसे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

मुक्ताईनगर, (जि.जळगाव) : मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा आहे असे सांगणारा सत्ताधारी गटातील मी पहिला आमदार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी दिली. खडसेंच्या मुक्ताईनगरातील फार्म हाऊससमोर आज सकल मराठा समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन केले. 

खडसे म्हणाले, पंढरपूर वारी दरम्यान मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे असे मी सांगितले होते. त्या निर्णयावर मी ठाम असून मराठा समाजाच्या आंदोलनाला माझा जाहीर पाठींबा आहे परंतू, हिंसक आंदोलन किंवा आत्महत्या करणे याचा पर्याय नाही असे त्यांनी सांगितले. मराठा समाजाने अगदी शांततेत राज्यभरातील आमदारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलने सुरु केली आहेत. आज मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊस समोर आज सकाळी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. 

यावेळी ऍड. रविंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, यु. डी. पाटील, निवृत्ती पाटील, संदीप देशमुख, दिनेश कदम, विनोद सोनवणे, ईश्वर रहाणे, माणिकराव पाटील, मुकेश महल्ले, संतोष मराठे, सुभाष बनिये, सदाशिव पाटील, सुभाष पाटील, दिलीप चोपडे, छबिलदास पाटील, विक्की मराठे, निवृत्ती पाटील, सुभाष बनीये, मंगेश काटे, पवनराजे पाटील, शिवराज पाटील, पवन चोपडे, त्रिशुल मराठे, तानाजी पाटील, प्रफुल्ल पाटील, संदीप शिंदे, विकास पाटील, विलास धायडे यांच्यासह मराठा समाजाचे विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख